scorecardresearch

ओवेसींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा शिरकाव; चारमिनारजवळ थाटलं कार्यालय

यापूर्वी १९६७ साली काँग्रेसने येथे कार्यालय सुरु करण्याचा प्रयत्न केला, पण…

ओवेसींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा शिरकाव; चारमिनारजवळ थाटलं कार्यालय
राहुल गांधी ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

तेलंगणात यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा पक्ष भारतीय राष्ट्र समिती ( बीआरएस ) आणि काँग्रेसमध्ये यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. यासाठी तेलंगणा राज्य काँग्रेसने तयारी सुरु केली असून, जुन्या हैदराबाद शहरात कार्यालय सुरु केलं आहे.

जुना हैदराबाद भाग हा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( एआयएमआयएम ) चा बालेकिल्ला आहे. एआयएमआयएमची केसीआर यांच्या बीआरएस पक्षाबरोबर युती असल्याचा आरोप करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर जुना हैदराबादमधील नागरिक आणि तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी चारमिनार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने आपलं कार्यालय सुरु केलं आहे.

हेही वाचा : “देशाच्या नव्या राष्ट्रपित्यांनी काय केलं?” अमृता फडणवीसांच्या विधानाचा आधार घेत नितीशकुमारांची मोदींवर खोचक टीका

याबाबत काँग्रेसचे नेते मोहम्मद अली शब्बीर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, “विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या हैदराबाद शहरात पक्षाचं विस्तार करण्यासाठी हे कार्यालय सुरु करण्यात आलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए रेवंत रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. काही दिवसांत हैदराबादमधील सर्व प्रभागांत कार्यालय उघडण्यात येणार आहे. तसेच, येथील सर्व प्रभागातील कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष रेड्डी संबोधित करणार आहेत,” असं मोहम्मद अली शब्बीर म्हणाले.

हेही वाचा : “युवकांच्या नोकऱ्या हिसकावून घेण्यात मोदी सरकार ‘विश्वगुरू’ झालंय”; खरगेंचं केंद्रावर टीकास्र; म्हणाले, “देशात आज…”

प्रदेश काँग्रेसमधील एका नेत्याने म्हटलं, “१९६७ साली काँग्रेसला मुस्लीमबहुल असलेल्या चारमिनार परिसरात कार्यालय उघडायचं होतं. पण, खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन ओवेसी अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर कार्यालय न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.”

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 19:05 IST

संबंधित बातम्या