मधु कांबळे

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरातील जाहीरनाम्याची अंमलबजावणी कशी करायची, यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे १ व २ जून रोजी शिर्डी येथे एक शिबीर पार पडले. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या उदयपूर शिबिराला नवसंकल्प शिबीर असे नाव देण्यात आले होते, तर प्रदेश काँग्रेसच्या शिर्डी शिबिराला नवसंकल्प कार्यशाळा असे नाव देण्यात आले होते. म्हणजे उदयपूर शिबिरातील ठराव किंवा पक्षाच्या पुढील वाटचालीसंबंधीचा जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला, तो कसा अंमलात आणायचा, याचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना प्रशिक्षण देणारी ती कार्यशाळा होती, असे सांगितले जाते. शिर्डी कार्यशाळेत उदयपूर जाहीरनाम्यातील मुद्यांना अनुसरून, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शेती व सहकार या विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या विषयांवर नेमेलल्या समित्यांनी अहवाल सादर केले, त्यावर आधारीत राज्यात आगामी काळात पक्षाच्या वाटचालीची दिशा निश्चित करण्यात आली.

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
RSS
‘आरएसएस’ विरोधात पत्रपरिषद घेणे भोवले, काय आहे प्रकरण जाणून घ्या सविस्तर…

देशात काय आणि महाराष्ट्रात काय काँग्रेससमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते राजकीय. त्याचा कसा सामना वा मुकाबला करणार हा प्रश्न आहे. राजकीय यश मिळाले तर, त्यानंतर आर्थिक, सामाजिक, शेती, सहकार वा इतर धोरणे अंमलात आणता येऊ शकतात. त्यामुळे सध्या राजकीय विषय महत्त्वाचा.

शिर्डी कार्यशाळेत राजकीय विषयावर चर्चा झाली, त्यानंतर जारी केलेल्या जाहीरनाम्यातील राजकीय धोरण, रणनीती व डावपेचावरच अधिक जागा व्यापेली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राज्यातील पक्षाचे एक प्रमुख नेते अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील राजकीय समितीने सादर केलेलल्या अहवालावर आधारीत राज्यातील पक्षाची आगामी काळातील रणनीती ठरविण्यात आली आहे.

हिंगोलीत काँग्रेस चाचपडतेय; सेना, भाजप, राष्ट्रवादी कामाला लागले

शिर्डी जाहीराम्यात जी राजकीय रणनीती दिसते आहे, ती संपूर्णपणे भाजपकेंद्रीत. केंद्रातील सत्ताधीश भाजपचे धार्मिक राजकारण, घटनात्मक संस्थांचा होणारा गैरवापर, राज्यपाल कार्यालयाचा अतिरेकी हस्तक्षेप, संघराज्य संरचनेवर वारंवार होणारे हल्ले, इतिहासाचे विद्रुपीकरण, मतांच्या ध्रुवीकरणासाठी धार्मिक-सामाजिक सलोख्यावर केले जाणारे आघात, लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारे बहुमताचे वर्चस्ववादी राजकारण, या भाजपच्या आव्हानात्मक राजकारणाचा कसा मुकाबला करायचा, त्याच्या रणनीतीची चर्चा करण्यात आली आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेसने पुढील काळात गावपातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत कोणकोणते कार्यक्रम राबवायचे, याचे सूतोवाच केले आहे. त्याची सविस्तर, तपशीलवार आखणी केली जाईल.

प्रत्यक्षात त्याची किती प्रभावी अंमलबजावणी होईल, त्याचे फलित काय असेल, हे नंतर पाहायला मिळेलच. परंतु देशात काय किंवा महाराष्ट्रात काय काँग्रेसपुढे फक्त भाजपचेच राजकीय आव्हान आहे का, किंबहुना ते तसेच गृहित धरून शिर्डी जाहीरनाम्यातही त्यावरच सारे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.

सचिन अहिर – कामगार ते गृहनिर्माण… सर्वत्र संचार

भाजप हा काँग्रेसचा कालही, आजही क्रमांक एकचा आणि थेट राजकीय शत्रू आहे, अर्थात तो उद्याही असणार आहे. त्यामुळेच कदाचित काँग्रेससमोर जे थेट आणि तगडे आव्हान ज्यांनी उभे केले आहे, त्या भाजपच्या विरोधातच लढण्याची रणनीती काँग्रेसला आखावी लागली असणार. परंतु राजकारणात विरोधक आणि स्पर्धक अशा दोन्ही प्रकारच्या राजकीय विचारसरणींचा सामना करावा लागतो. त्याशिवाय कोणत्याही पक्षाला आपले अस्तित्व दाखवताही येत नाही आणि टिकवताही येत नाही.

महाराष्ट्राच्या सत्तेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत काँग्रेस हा भागीदार पक्ष आहे. शिवसेनेची महत्त्वकांक्षा, राष्ट्रवादीची सत्ताकांक्षा आणि काँग्रेसची अगतिकता अशा विचित्र राजकीय मिश्रणातून हे नवे सत्ताकारण अस्तित्वात आले आहे. म्हणजे काँग्रेससाठी ते नक्कीच चांगले नाही. किंबहुना पुढील वाटचालीसाठी ते अडचणीचेच ठरणारे आहे.

सत्तेसाठी तीन पक्ष एकत्र आले तरी, प्रत्येकाचा मतदार आणि त्याला बांधून ठेवणारी त्यांची विचारसरणी याचा प्रचार-प्रसार तर होणारच. पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेचा संसार थाटून काँग्रेसने तो अनुभव घेतला आहे. आताही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपले आपले राजकीय कार्यक्रम जोरकसपणे लोकांसमोर जाऊन मांडायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तर, स्वतः जातीने लक्ष घालून पक्षवाढ व विस्तारासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून वर्षा-दीड वर्षात संबंध महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्याचे परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसतील.

दुसऱ्या बाजूला शिवसेनेने सत्तेसाठी काही वेळ बाजूला सारलेली हिंदुत्वाची शाल पुन्हा अंगावर घेत, भाजपला प्रतिआव्हान देता, देता, आपला मतदार इतरत्र वळणार नाही, याची खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. हाच मुद्दा उद्याच्या राजकारणात काँग्रेससाठी अडचणीचा व कळीचा ठरणार आहे. समजा उद्या स्थानिक स्वराज्य संस्थां वा पुढे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनाशी आघाडी करण्याची वेळ आलीच, तर शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या प्रचारात काँग्रेस सहभागी होणार का ? या प्रश्नाचा विचार काँग्रेसला पुढील राजकीय डावपेच ठरवताना करावा लागणार आहे.

एका पोटनिवडणुकीमुळे काँग्रेसचं पुनरागमन होईल? केरळच्या विरोधी पक्षनेत्यांना विश्वास; नेमकं तिथे घडतंय काय?

काँग्रेसची एक जमेची बाजू म्हणजे राज्यात पक्षाकडे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार असे काही जुने जाणते व नव्या दमाचे नेते आहेत. त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. अजूनही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. लोकांपर्यंत पक्षाला जाण्याची गरज आहे. राजकीय रणनीतीवर आणखी सखोल चर्चा होईलच, परंतु देशात भाजपने जे सूडाचे राजकारण सुरु केले आहे, त्याला थोपवण्यासाठी उदयपूर जाहीरम्याच्या माध्यमातून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व नेते राहुल गांधी यांनी जो कार्यक्रम दिला आहे, त्यावर शिर्डी कार्यशाळेत सविस्तर चर्चा झाली व पुढील वाटचीलीची दिशा निश्चित करण्यात आली. त्याचा फायदा आगामी सर्वच निवडणुकांमध्ये पक्षाला नक्कीच होईल, असा दावा , प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे.