भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अलीकडेच ‘संसद ही सर्वोच्च आहे’ असं विधान केलं. धनखड यांच्या विधानावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी आक्षेप घेतला. त्यांनी उपराष्ट्रपती धनखड यांच्या विधानाचं खंडन केलं असून ‘संविधान हेच सर्वोच्च आहे’ असं त्यांनी म्हटलं.

“राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड जर म्हणत असतील की संसद ही सर्वोच्च आहे, तर ते चुकीचे आहेत. संविधान ही सर्वोच्च आहे. बहुसंख्याकांकडून संविधानाच्या मूळ तत्त्वावरील हल्ला रोखण्यासाठी मूलभूत संरचनेची मांडणी करण्यात आली” असं चिदंबरम यांनी आपल्या ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

PM Modi and Jitendra awhad
“राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार…”, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा संताप; म्हणाले, “काँग्रेसच्या नावावर…”
Lok Sabha elections between Narendra Modi and Rahul Gandhi and Modi will become PM for third time says Devendra Fadnavis
गरिबांच्या आशीर्वादामुळे मोदींचा साधा केसही वाकडा होणे नाही – देवेंद्र फडणवीस
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

हेही वाचा- ‘भारत जोडो’ यात्रेच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन; तब्बल २१ राजकीय पक्षांच्या प्रमुखांना सहभागी होण्याचे आवाहन

“समजा जर संसदेनं बहुमताच्या जोरावर देशातील संसदीय लोकशाही व्यवस्था अध्यक्षीय लोकशाहीत बदलली. किंवा परिशिष्ट ७ मधील राज्यांची यादी रद्द केली आणि राज्य विधिमंडळाचे सर्व अधिकार काढून घेतले, तर अशी घटना दुरुस्ती वैध असेल का?” असा सवालही पी चिदंबरम यांनी विचारला आहे.

देशातील विधानसभा अध्यक्षांचं ८३ वे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलन राजस्थानमधील जयपूर येथे पार पडत आहे. याचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. तर, कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला होते. या कार्यक्रमातून जगदीप धनखड यांनी संसदेच्या कामात सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा- तृणमूलच्या महुआ मोईत्रांनी बनवला चहा अन् होऊ लागली थेट मोदींशी तुलना, कॅप्शन ठरले निमित्त! नेमकं काय घडलं?

यावेळी धनखड म्हणाले, “आपण संसदेत न्यायालयाचा निकाल लिहू शकत नाही. तसेच, न्यायालय कायदे तयार करु शकत नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे लोकशाहीत सर्व संस्थांनी आपल्या क्षेत्राच्या मर्यादेत राहत, अन्य संस्थांमध्ये घुसखोरी करु नये. अंतिम निर्णय हा संसद घेते. त्यामुळे अन्य संस्थांमध्ये कोण असेल ते देखील संसद ठरवेल,” असं धनखड यांनी सांगितलं. यावर पी चिदंबरम यांनी आक्षेप घेतला.