छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीमध्ये घ्या असा आग्रह करुन झाल्यानंतर ‘एमआयएम’ ची भूमिका ठरविण्यासाठी रविवारी असदोद्दीन ओवेसी छत्रपती संभाजीनगर येथे येणार आहेत. विधानसभा निवडणुकीतून प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीस उभे करायचे याचा निर्णय तेव्हा घेतला जाईल, असे माजी खासदार जलील यांनी स्पष्ट केले. ‘ संभाजीनगर ( पूर्व )’ की ‘ संभाजीनगर (मध्य) या दोन मतदारसंघांपैकी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याचा निर्णय जाहीर न करता आपल्या उमेदवारी बाबत संभ्रम कायम ठेवण्यात जलील यांना यश आले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद शहरातील तीन मतदारसंघापैकी दोन मतदारसंघात आघाडी मिळविण्यात इम्तियाज जलील यांना यश मिळाले होते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात ‘एमआयएम’ चे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. मात्र, कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार याचे तपशील जाहीर होऊ नयेत, असा संभ्रम कायम ठेवण्यात आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ’एमआयएम’ ला त्यांचा प्रभाव कायम ठेवता आला नव्हता. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून डॉ. गफ्फार कादरी पराभूत झाले होते. अतुल सावे यांना यश मिळाले. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रदीप जैस्वाल यांना यश मिळाले होते. त्यामुळे एमआयएमच्या विधानसभेतील प्रभाव कमी झाला होता. आता लोकसभेत पराभूत झाल्यानंतर इम्तियाज जलील हे पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. या पूर्वी ते औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. भाजप व शिवसेनेतील मतांच्या विभागणीचा त्यांना लाभ झाला होता.

bjp pradipsinh Jadeja marathi news
अजितदादांच्या बालेकिल्ल्यावर गुजरात भाजपच्या नेत्याची नजर
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Loksatta karan rajkaran Assembly Election 2024 Controversy between Chhagan Bhujbal and Suhas Kande MVA print politics news
कारण राजकारण: कांदे-भुजबळ वादामुळे मविआला लाभ
Vinesh Phogat and Bajrang Punia joins congress
Vinesh Phogat Join Congress: विनेश फोगट, बजरंग पुनियाच्या काँग्रेस प्रवेशामुळे सत्ताधारी भाजपाला धक्का; हरियाणात सत्तांतार होणार?
Madhabi Puri Buch
Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ? ‘हिंडनबर्ग’च्या आरोपांची लोकलेखा समितीकडून चौकशीची शक्यता
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Petitioners against reservation of Maratha society claim in High Court Mumbai news news
मराठा समाजाचे मागासलेपण स्वयंघोषित; आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा
maha vikas aghadi allies creating trouble for rohit pawar in Karjat Jamkhed constituency
कारण राजकारण : रोहित पवारांच्या कोंडीचे मित्रपक्षांकडूनच प्रयत्न

आणखी वाचा-पंतप्रधानांनी देशवासीयांचीच माफी मागावी; शिवपुतळा, जीएसटी, नोटाबंदीचा उल्लेख करत राहुल गांधी यांचे टीकास्त्र

आता औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रदीप जैस्वाल, ठाकरे गटातून दोन इच्छुकांची नावे समोर केली जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मतविभागणीचा लाभ होईल असा एमआयएमचा होरा आहे. अशीच परिस्थिती औरंगाबाद पूर्वमध्येही असेल. भाजपचे अतुल सावे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजू वैद्य असे मत विभाजन होईल, असा दावा करत या मतदारसंघात जलील बांधणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अलिकडेच त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या सहाय्यकाने गैर मार्गाने जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जलील हे पूर्व मतदारसंघातून लढतील असा दावा केला जात आहे. ‘आम्हाला तयारीची गरज नाही. आम्ही निवडणूक लढवू’ असे जलील यांनी नुकतेच सांगितले. पण मतदारसंघ कोणता याचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून उतरायचे याचा निर्णय ओवेसी घेतील, असे ते सांगत आहेत.