scorecardresearch

Premium

राज्यात सध्या ८.३३ टक्के महिला आमदार, आरक्षणानंतर महिला आमदारांची संख्या होणार ९६

महिला आरक्षण कायदा लागू झाल्यावर राज्यातील महिला आमदारांची संख्या किमान ९६ होणार आहे.

vidhan bhavan
राज्य विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत २४ महिला आमदार निवड़ून आल्या आहेत.

संतोष प्रधान

महाराष्ट्र विधानसभेत सध्या २४ महिला आमदार असून, एकूण सदस्यसंख्येच्या हे प्रमाण ८.३३ टक्के आहे. महिला आरक्षण कायदा लागू झाल्यावर राज्यातील महिला आमदारांची संख्या किमान ९६ होणार आहे.

Gadchiroli HMIS
अपुऱ्या पायाभूत सुविधा तरीही सलग दुसऱ्या वर्षी पाहिले स्थान, ‘एचएमआयएस’ गुणांकनात ‘ही’ आहे जिल्ह्यांची क्रमवारी
narendra modi
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; लोकसभा, विधानसभेत ३३ टक्के आरक्षणासाठी विधेयक
drought
निम्म्या राज्यावर संकट; राज्यातील ३५५ पैकी १९३ तालुके अवर्षणग्रस्त
mali community raise objection on maratha reservation
…तर ओबीसी प्रवर्गातील इतर जातींवर अन्याय होणार; माळी महासंघाने घेतला आक्षेप

राज्य विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत २४ महिला आमदार निवड़ून आल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून नजर टाकल्यास सर्वाधिक २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २० महिला आमदार निवडून आल्या होत्या. त्यापेक्षा २०१९ मध्येही महिला आमदारांच्या संख्याबळात वाढ झाली. २८८ सदस्यीय राज्य विधानसभेत महिला सदस्यांचे प्रमाण हे ८.३३ टक्के आहे.

आणखी वाचा-Women’s Reservation Bill : ममता बॅनर्जींच्या रुपात देशात एकमेव महिला मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसमध्ये महिलांना किती संधी?

संसदेत मांडण्यात आलेल्या घटना दुरुस्तीनुसार ३३ टक्के आरक्षण विधानसभेत लागू झाल्यावर महाराष्ट्र विधानसभेतील ९६ जागा या महिलांसाठी राखीव होतील. म्हणजेच किमान ९६ महिला आमदार विधानसभेत दिसतील. सर्वसाधारण मतदारसंघातूनही महिला आमदार निवडून येऊ शकतात.

राज्यातील महिला आमदारांचे संख्याबळ :

१९६२ : १३
१९६७ : ९
१९७२ : ०
१९७८ : ८
१९८० : १९
१९८५ : १६
१९९० : ६
१९९५ : ११
१९९९ : १२
२००४ : १२
२००९ : ११
२०१४ : २०
२०१९ : २४

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Currently 8 33 percent women mlas in state after reservation number of women mlas will be 96 print politics news mrj

First published on: 20-09-2023 at 11:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×