कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघाची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे भाजपमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले समरजित घाटगे यांची कोंडी झाली असून त्याचा फटका महायुतीला बसण्याची चिन्हे आहेत. याचा फायदा महाविकास आघाडी घेते का, यावर कागलचा कल ठरणार आहे.

कागल विधानसभा मतदारसंघात नेहमीच संघर्ष पूर्ण लढती होत असल्याचा इतिहास आहे. २०१९ सालच्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी न मिळाल्याने समरजित घाटगे अपक्ष राहिले होते. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत ८८ हजार ३०३ मते घेतली होती. संजय घाटगे यांना ५५ हजार ६५७ मते मिळाली होती. तर, १ लाख १६ हजार ४३६ मते मिळवणारे हसन मुश्रीफ हे २८ हजार १३३ मताधिक्य घेऊन पाचव्यांदा आमदार झाले.

Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Shadashtak yoga will create Saturn-Sun
शनी-सूर्य निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार संकटांचं वादळ होणार आर्थिक नुकसान
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
CPI(M) General Secretary Sitaram Yechury died at 72 in delhi marathi news
Sitaram Yechury Passes Away : किर्तीरुपी उरावे! सीताराम येचुरी यांच्या कुटुंबीयांचा मोठा निर्णय, संशोधनासाठी रुग्णालयाला देहदान!
Sitaram Yechury pass away know about his important role in politics
येचुरींच्या जाण्याने आशावादाचा स्रोत गमावला!

राज्यातील बदलत्या राजकारणात मुश्रीफ यांनी शरद पवार यांचा हात सोडून अजित पवार यांची साथ धरली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बनले. परिणामी त्यांच्या मागे दोन वर्षे लागलेली ‘ईडी’ची पीडा सुटली आहे. त्यामुळे मुश्रीफ हे पुन्हा आक्रमकपणे जिल्ह्यात वर्चस्व मिळवू पाहात आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. या महाविद्यालयीन मित्रांची मैत्री अनेक वर्षे चर्चेत होती. आता ती उघडपणे राजकीय मंचावर पुढे आली आहे.

हेही वाचा >>> विश्वजित कदम – संग्रामसिंह देशमुख पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा समोरासमोर ?

शाहू उद्याोग समूहाचे नेते समरजित घाटगे यांनी गेल्यावेळी पदार्पणातच चांगली मते घेतली होती. गेली पाच वर्षे त्यांनी निवडणूक लढवण्याच्या निर्धाराने नियोजनबद्ध पावले टाकली आहेत. राधानगरी धरण येथे शाहू जयंती साजरी करताना त्यांनी पुढील वेळी येताना आमदारकीचा गुलाल लावून येणार असा निर्धार व्यक्त केला. आता मतदारसंघात मुश्रीफ-घाटगे या दोन शक्ती एकत्र आल्याने समरजित घाटगे यांच्या समोरचे आव्हान वाढले आहे. अशावेळी बदलती समीकरणे त्यांना अनुकूल ठरतील असे दिसू लागले आहे.

संजय घाटगे यावेळी उमेदवार नसणार हे उघड आहे. साहजिकच ‘मविआ’चा सक्षम उमेदवाराचा शोध समरजित घाटगे यांच्या रूपाने संपू शकतो. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याशी संधान साधले आहे. घाटगे यांचेही वरिष्ठांशी गुफ्तगू सुरू झाले आहे.

समरजित घाटगे यांच्या शाहू साखर कारखान्यामुळे कागल आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात प्रभाव आहे.

दक्षिणचे काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना त्यांची मदत मिळू शकते. ती शक्यता गृहीत धरून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील हे घाटगे यांना तेथे बळ देऊ शकतात. शिवाय, गडहिंग्लज तालुक्याचे जनता दलाचे दिवंगत प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, जनता दलाचा गटही घाटगे यांच्यामागे राहू शकतो.

अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर हालचाली?

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा हे लवकरच कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. तोपर्यंत जिल्ह्यातील विशेषत: भाजपमधील राजकारणात सारे काही आलबेल असेल. मात्र, शहा यांचा दौरा आटोपताच कागलमध्ये राजकीय समीकरणे फिरलेली दिसतील. उमेदवारी न मिळण्याच्या शक्यतेने समरजित घाटगे हे उघडपणे ‘तुतारी’ वाजवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास मुश्रीफ यांच्या समोरचे आव्हान अधिकच कडवे होईल