मुंबई : अर्थसंकल्प सादर करताना तुकोबांच्या अभंगाचे दाखले देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी पक्षाच्या आमदारांसह प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाले. सारी विघ्ने दूर होऊन पुन्हा सत्ता मिळावी, अशीच प्रार्थना केल्याची चर्चा आहे. राज्यातील नेतेमंडळी मंदिरांना भेटी किंवा बाबाबुवांकडे जाणे नवीन नाही. पण याला पवार कुटुंबीय अपवाद होते.

हेही वाचा >>> भायखळ्याला यंदाही नवीन आमदार?

ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा
shinde shiv sena may not nominated mla yamini jadhav from byculla constituency for assembly election
भायखळ्याला यंदाही नवीन आमदार?
Mumbai BMW Hit and run case latest update
Worli Hit And Run Case : मिहीर शाहच्या मित्राची ‘ती’ एक चूक अन् पोलिसांनी आवळल्या साऱ्यांच्याच मुसक्या! अटकेचा घटनाक्रम वाचा
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
maharashtra mlc election votes calculation
एक उमेदवार हरणार हे नक्की, पण तो कुणाचा? वाचा विधानपरिषद निवडणुकीसाठीचं पक्षीय बलाबल!
sharad pawar criticized on government schemes over implementation
सरकारच्या योजना फसव्या, लागू होण्याबाबत शंका – शरद पवार
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

अजित पवार यांनी सादर केलेल्या नऊ अर्थसंकल्पांमध्ये कधीच अभंगाचा दाखला दिला नव्हता. पण यंदा प्रथमच तुकोबाचा अभंग अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला व अखेरीस सादर केला. तसेच पुंडलिक वरदे हा जयघोषही केला. दोनच दिवसांपूर्वी अजित पवार हे सपत्निक वारीत सहभागी झाले होते. आज पक्षाच्या आमदारांसह बसमधून थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेले. तेथे आमदारांसह गणरायाचे दर्शन घेतले. पूजाअर्जा केली. निवडणुकीत यश मिळावे यासाठी त्यांनी मनोभावे प्रार्थना केली. भाजपच्या संगतीत अजित पवार बदलले आणि देवभक्त झाले, अशीच प्रतिक्रिया विधान भवनात होती. विधानसभेसाठी पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील रणनीतीकारांची त्यांनी मदत घेतली आहे.