सावंतवाडी : चौथ्यांदा निवडून येण्याचा निर्धार करून रिंगणात उतरलेले शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर शिवसेनेचे (ठाकरे) राजन तेली उभे ठाकले असतानाच भाजपमधून झालेल्या बंडखोरीमुळे केसरकर यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे.

सावंतवाडी मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांमधील बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असल्याने मतदारसंघातील तिढा अधिकच वाढला आहे. या मतदारसंघातून सलग तीन वेळा केसरकर निवडून आले आहेत. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर २०१४ आणि २०१९ शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेले आहेत. मात्र यावेळी मतदारसंघातील बदलती राजकीय समीकरणे आणि सहयोगी भाजप पक्षातील बंडखोरी यामुळे त्यांच्या अडचणी वाढत आहेत.

Latur City Assembly Constituency Assembly Election Amit Deshmukh will contest election print politics news
लक्षवेधी लढत: लातूर : देशमुख, चाकूरकर घराण्याची प्रतिष्ठा पणाला
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा >>>त्र्यंबकनगरीत पूजाअर्चेसाठी उमेदवारांची गर्दी वाढली

ऐन निवडणुकीपूर्वी भाजपच्या राजन तेली यांनी शिवसेना ठाकरे गटात जाऊन उमेदवारी मिळवली. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता भाजपच्याच विशाल परब यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीतही बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अर्चना घारे परब याही अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांपुढेही बंडखोरांना थोपवण्याचे आव्हान आहे.

सावंतवाडी मतदारसंघात १९७२ ते २०१९ पर्यंत पाच वेळा काँग्रेस आमदार विजयी झाले आहेत. पण आता या मतदारसंघात काँग्रेसचे फारसे प्राबल्य नाही. शिवसेनेने १९९९ पासून या मतदारसंघात आपली पकड मजबूत केली. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर केसरकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची ताकद विभागली गेली आहे. यंदा मतदारसंघात प्रथमच शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा >>>नवाब मलिक वि. अबू आझमी: मानखूर्दमध्ये दोन मुस्लीम नेत्यांच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाला लाभ मिळणार?

राणे यांची भूमिका महत्त्वाची

दीपक केसरकर यांचे नारायण राणे यांच्याशी स्थानिक राजकारणात फारसे कधीच पटले नाही. पण लोकसभा निवडणुकीत केसरकर यांनी जुना वाद विसरून राणे यांना मदत केली. यातूनच राणे यांना सावंतवाडीमध्ये मताधिक्य मिळाले होते. राणे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय राजन तेली ठाकरे गटात प्रवेश करून अर्ज दाखल केला. तेली निवडून येणे राणे यांच्यासाठी सोयीचे नाही. यामुळेच केसरकर यांच्या पाठीशी राणे यांनी ताकद उभी केली आहे.

लोकसभेतील राजकीय चित्र

महायुती- ८५,३१२ महाविकास आघाडी- ५३,५९३