Delhi Mayor Elections: दिल्ली महापालिकेत नवनिर्वाचित नगरसेवक आणि नामनिर्देशित सदस्य यांच्यात सर्वात अगोदर शपथ कोणा घेणार? या मुद्य्यावरून महापालिकेच्या सभागृहात ६ जानेवारी रोजी जोरदार गदारोळ झाला होता. अखेर आता सर्वप्रथम निवडून आलेले नगरसेवक शपथ घेणार असून, त्यानंतर नामनिर्देशित सदस्यांचा मंगळवारी शपथविधी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापौर अणि उपमहापौरांच्या निवडीसाठी उद्या (२४ जानेवारी) पुन्हा बैठक होणार आहे. कारण, सभागृहात आम आदमी पार्टी आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या भांडणानंतर पहिल्या सभेत ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. दिल्ली महापालिकेच्या अजेंड्यानुसार सर्वप्रथम निवडून आलेले नगरसेवक आणि त्यानंतर नामनिर्देशित सदस्य शपत घेणार आहेत, त्यानंतर महापौर आणि उपमहापौरांचा शपथविधी होणार आहे. या शिवाय याबैठकीत स्थायी समितीचे सहा सदस्यही निवडले जाणार आहेत.

Milind Narvekar and Eknath Shinde
मिलिंद नार्वेकर शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभा लढविणार? शिंदे गटाच्या ऑफरच्या चर्चेवर उद्धव ठाकरे म्हणाले…
Thane Lok Sabha, OBC Bahujan Party candidate,
ठाणे लोकसभेच्या रिंगणात ओबीसी बहुजन पार्टीचा उमदेवार
Sangli Friendly fight will be decided by congress in Delhi tomorrow
सांगलीतील मैत्रीपूर्ण लढतीचा उद्या दिल्लीत निर्णय
not MIM but Leaders who surrendered to BJP B Team says MIM District President Dr Mobin Khans
‘एमआयएम’ नव्हे भाजपला शरण गेलेले नेते ‘बी टीम’! जिल्हाध्यक्षांचा टोला; म्हणाले, “आम्हीही लोकसभा लढविणार…”

आम आदमी पार्टीने १३४ जागांवर विजय मिळवत दिल्ली महापालिका निवडणूक जिंकली होती. महापालिकेच्या सभागृहात निवडून आलेले २५० नगरसेवक आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांव्यतिरिक्त दिल्लीतील भाजपाचे सात लोकसभा खासदार, आम आदमी पार्टीचे तीन राज्यभा खासदार आणि दिल्ली विधानसभा अध्यक्षांद्वारे नामनिर्देशित १४ आमदार महापौर निवडणुकीत सहभाग घेतील. नामनिर्देशित सदस्य मतदान करत नाहीत.

महापौर निवडीवरून भाजपा आणि ‘आप’च्या नगरसेवकांनी एकमेकांना मारहाणही केली आहे. दिल्लीत २०२२ च्या एमसीडी निवडणुकीत आम आदमी पार्टीने २५० पैकी १३४ जागांवर विजय संपादन केला. तर भाजपाला १०४ जागा जिंकता आल्या. महापालिका निवडणुकीत ‘आप’ला बहुमत असलं तरी दिल्लीचा महापौर हा आम आदमी पार्टीचाच होईल, असं नाही. येथे भाजपाचाही महापौर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

दिल्ली महापालिकेत महापौर निवडणूक कशी होते? –

दिल्लीत महापौर निवडण्यासाठी मतदार थेट मतदान करत नाहीत. दिल्ली एमसीडीच्या सदस्यांच्या मतदानाद्वारे महापौर निवडून दिला जातो. दिल्ली एमसीडीमध्ये एकूण २५० नगरसेवक आहेत. दिल्ली महानगरपालिका अधिनियम, १९५७च्या नियम ३५ नुसार, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या बैठकीत महापौरांची नियुक्ती केली जाते. नियमानुसार बहुमत असणाऱ्या पक्षाकडून महापौरपदासाठी दावा केला जातो. तसेच विरोधी पक्षाने उमेदवार दिल्यास महापौर पदासाठी निवडणूक घेतली जाते.

विशेष म्हणजे महापौर पदाचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असतो. नियमानुसार पहिल्या वर्षी महापौरपदासाठी महिला उमेदवाराची निवड केली जाते, तर तिसऱ्या वर्षी अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवाराची निवड केली जाते. दिल्ली महापौर पदासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांबरोबच दिल्लीतील १४ आमदार, १० लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांकडूनही मतदान करण्यात येते. मात्र, निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यांना मतदान करता येत नाही.