इंदापूर : राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सव्वाकोटी महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत. या योजनेद्वारे दर वर्षी ४६ हजार कोटी रुपये महिलांना मिळणार आहेत. हाच पैसा पुन्हा बाजारात येऊन बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढणार आहे, असे माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार दत्तात्रेय भरणे उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, की तळागाळातील घटकामधील गोरगरीब महिलांना आर्थिक अडचणीच्या काळात त्यांच्या हातात विविध गरजांसाठी चार पैसे असावेत, यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. लोकसभेत निकाल दिला तो मतदारांचा अधिकार आहे. त्या वेळी संविधान बदलणार, असा प्रचार करण्यात आला. केंद्र सरकारने सीएए कायदा आणला, त्या वेळी गैरसमज पसरवला गेला. बाहेरील देशातील आपल्या लोकांना भारतात आणायला नको का? त्यांना इकडे आणणार आणि तुम्हाला तिकडे पाठवणार, असा गैरसमज अल्पसंख्याक समाजात पसरविण्यात आला. मात्र, आता विधानसभेला अशा प्रचाराला बळी पडू नका. महायुतीचे अधिकाधिक आमदार निवडून द्या. म्हणजे आम्ही सुरू केलेल्या योजना सुरू ठेवता येतील, आता ते तुमच्या हातात आहे, असेही पवार म्हणाले.

mla sada sarvankar effort to waive 26 rent of st space given to women self help group
आर्थिक संकटातील एसटीची आमदारांकडूनच लूट
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
maharashtra facing financial pressure due to new schemes
नवीन योजनांचा राज्याच्या तिजोरीवर भार ;वित्त विभागाच्या नकारानंतरही १,७०० कोटी रुपयांच्या क्रीडा संकुलांना मंजुरी
Opposition leader Ambadas Danve demanded an inquiry from the governor regarding the crores of works in the construction department before the elections print politics news
निवडणुकीपूर्वी बांधकाम विभागात कोट्यवधींच्या कामांना परवानगी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची राज्यपालांकडे चौकशीची मागणी
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?
Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana
Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार? आदिती तटकरे म्हणाल्या…
Maharashtra ST Employees Congress General Secretary Srirang Barge allegation regarding ST employee pay hike credit
‘एसटी’ कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
ajit pawar cancel tender of chanakya excellence center concept of bjp minister mangal prabhat lodha
भाजप मंत्र्याच्या प्रकल्पाला अजितदादांचा खो; चाणक्य केंद्रा’च्या आरेखनात बदलाची सूचना, नावालाही आक्षेप