सौरभ कुलश्रेष्ठ

डोक्यावर गांधी टोपी, डोळ्यांवर चष्मा अंगात पांढरा कुर्ता पायजमा असे अत्यंत साध्या ग्रामीण वेशातील नरहरी झिरवळ विधानसभा उपाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर आभाराचे भाषण करायला उठले तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर औपचारिक भाव होते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र गालातल्या गालात हसत होते. माझा स्वभाव वेगळाय. गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री व्हते म्हणून  त्यांना चांगलाच माहिताय. जिल्ह्यात बैठकीला आले आन् मी दिसलो की बोलायचे एकदाच बोलून घ्या परत उठूच नका, असा पहिलाच वाक्याला चौकार ठोकत झिरवळ यांनी सभागृहच ताब्यात घेतले. नंतर विधानसभेत विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेते डाव्या बाजूला बसतात याचा संदर्भ देत मोबाईलवर बोलून बोलून माझा डावाच कान निकामी होत आलायं अशी इरसाल बतावणी करत झिरवळ यांनी षटकारच ठोकला आणि विरोधकांसह सारेच हास्यात बुडाले. झिरवळ उठताच अजित पवार गालातल्या गालात का हसत होते याचे कोडे उलगडले. वेश साधा असला परी अंगी नाना कळा असे हे बहुरंगी व्यक्तिमत्त्व आता बंडखोरांच्या अपात्रतेच्या कारवाईत निर्णायक भूमिका बजावणार आहेत. 

Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
raver lok sabha marathi news, ravel lok sabha ncp candidate marathi news
भाजपमधून प्रवेश केलेल्या श्रीराम पवार यांना रावेरमध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी
ravi rana bachchu kadu
“बच्चू कडूंसमोर हात जोडून विनंती करतो…”, पत्नीला लोकसभेची उमेदवारी मिळताच रवी राणा नरमले?
Parbhani Lok Sabha 2024 election, shiv sena, candidate, Sanjay Jadhav, Uddhav Thackeray, hat trick
ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले संजय जाधव हॅटट्रिक करणार का ?

पक्षांतर बंदी कायदा व गट विलिनीकरणाबद्दल शिंदे गट अनभिज्ञ-विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे

विधानसभेतील शिवसेना बंडखोर आमदारांना अपात्र करण्याबाबत शिवसेनेच्या याचिकेवरून एकनाथ शिंदेंसह १६ जणांना नोटीस बजावल्यानंतर आणि भाजपशी निगडीत दोन अपक्ष आमदारांनी अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवळ यांनी मोदी लाटेत २०१४ मध्ये व २०१९ मध्ये निवडून येताना सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. मधल्या काळात एक पराभव होण्याआधीही ते एकदा आमदार होते. आदिवासी समाजातून आलेले झिरवळ यांनी बांधकाम कामगार ते आमदार हा पल्ला आयुष्यात गाठला आहे. उपाध्यक्ष झाल्यानंतरच्या त्या भाषणानंतर झिरवळ एकदम प्रकाश झोतात आले. कष्टांवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. यश हे अंतिम नसतं. अपयश घातक नसतं. या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागते, अशी ओळ माझ्या घराच्या भिंतीवर लिहिल्याचे झिरवळ यांनी सांगताच सभागृहाने बाके वाजवून त्यांना दाद दिली होती. मला भजन-पूजन गावठी तमाशासुद्धा येतो. गावठी तमाशा म्हणजे पुरुषानंच लुगडं घालून नाचायचं-गायचं…सहज गंमत, असे खास आपल्या ग्रामीण ठसक्यात झिरवळ यांनी सांगून टाकले.

सुधीर मुनगंटीवार यांनी २००४ मध्ये भिकाऱ्यांसाठी काही तरी सरकारने करावे अशी मागणी केल्याची आठवण झिरवळ यांनी सांगितलीच. पण त्यानंतर मुनगंटीवारसाहेबांनी वनमंत्री म्हणून ३३ कोटी वृक्ष लावल्याचे म्हणतात, पण ते कोणी पाहिले नाहीत. आपण एकदा मोजू, असे सांगत झिरवळ यांनी मुनगंटीवारांची अलगद टोपी उडवली. आदिवासी भागात जाळी-मुळी, जादूटोणा भगत हे सारं चालतं. त्या जादूटोणा-आयुर्वेदावरच मी मोदी लाटेत निवडून आलो. इथं आपन सगळे शिकलेले सवरलेले म्हणून जादूटोणाबंदी म्हणतो आणि घरी जाऊन सगळेच काहीना काही तरी करतो असे सांगत झिरवळ यांनी एक सूचक नजर शेजारी बसलेल्या आणि हातात अनेक गंडेदोरे बांधणाऱ्या आणि मुख्यमंत्रीपद वाचावे यासाठी वर्षा बंगल्यावर मध्यरात्री आगळी-वेगळी विशेष पूजा केल्याची छायाचित्र झळकली त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकली होती. ओल्या सरपणाची अवजड मोळी आदिवासी बायका कशा आणतात. त्यानंतर फुकणीने चूल फुंकल्यावर महिलांना छातीचे व पोटाचे आजार कसे वाढतात असे सांगत सामान्य माणसाच्या समस्यांची जाण दाखवून दिली होती आणि त्यावरील उपायांची चर्चाही त्याच भाषणात केली होती. 

बंडखोर शिंदे गटाकडून अजित पवार आणि राष्ट्रवादी लक्ष्य, नियोजनबद्ध प्रचार मोहीम

कालानुरूप बदलत्या राजकारणाशी जुळवून घेताना झिरवळ यांनी आपल्यातील शेतकरी व ग्रामीण संवेदना व अभिव्यक्ती असलेला माणूस फॉर्च्युनर गाड्यांच्या नवराजकीय संसस्कृतीमध्ये हरवू दिलेला नाही. त्यामुळेच शेतात नांगर धरणे व मुंबईतील उच्चभ्रू कुलाबा भागात भिकाऱ्यांशी गप्पा मारत त्यांच्याशी मैत्री करणे झिरवळ यांना इतकी वर्षे आमदार झाल्यावरही सहज जमते. लोकांमध्ये मिसळण्याच्या याच हातोटीमुळे २०१४ मधील त्यांचे १२ हजारांचे मताधिक्य २०१९ मध्ये थेट ६० हजारांवर गेले. इतकेच नव्हे तर अजित पवार यांच्यासारख्या वक्तशीर माणसाने सकाळी ७ वाजताची सभा ठेवल्यानंतरही राजकीय कायर्क्रमांच्या दृष्टीने भल्या पहाटे म्हणाव्या अशा या वेळी मतदारसंघातील काही हजार माणसांची गर्दी झिरवळ सहज जमवातात. म्हणूनच ते अजित पवार यांचे अत्यंत लाडके आणि विश्वासू आहेत. याचेच फळ म्हणून विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. सध्या विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त असल्याने विश्वासदर्शक ठराव, बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी असे अत्यंत कसोटीचे प्रसंग नरहरी झिरवळ यांच्यासमोर येणार असून वेश साधा असला तरी नाना कळा अवगत असलेले झिरवळ या महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक कालखंडात आपली काय छाप पाडतात याची सर्वांनाच उत्सुकता आहे.