संतोष प्रधान
भाजपच्या नवी दिल्लीत झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष महत्त्व देण्यात आले. फडणवीस यांचा एक प्रकारे हा सन्मानच मानला जातो.
हेही वाचा >>> सत्ताधाऱ्यांच्या दणक्यानंतर तमिळनाडूच्या राज्यपालांची माघार
दावोसला झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेला जाण्याऐवजी फडणवीस यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली. पक्षाच्या कायर्रकारिणीच्या बैठकीत राजकीय ठराव मांडण्याची संधी फडणवीस यांना देण्यात आली होती. त्याचबरोबर बैठकीच्या अखेरीस पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची माहिती देण्याची महत्त्वाची जबाबदारी फडणीस यांच्यावर सोपविण्यात आली होती.
वास्तविक पंतप्रधान किंवा पक्षाध्यक्षांच्या भाषणाची माहिती पत्रकार परिषदेत पक्षाचे मुख्य प्रवक्ते किंवा एखाद्या केंद्रीय मंत्र्याकडून दिली जाते. या वेळी ही जबाबदारी फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
हेही वाचा >>> नागपूरमध्ये भाजप अंतर्गत धुसफूस
राजकीय ठराव मांडण्याची तसेच पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची माहिती देण्याकरिता पत्रकार देण्याची महत्त्वाची जबाबदारी पक्षाने फडणवीस यांना दिली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यावर फडणवीस यांची इच्छा नसतानाही त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडून पक्षाने त्यांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात होते. पण पक्षातील त्यांचे महत्त्व दिल्लीतील बैठकीत अधोरेखित झाले.