scorecardresearch

धनंजय मुंडे यांचा लातूरकरांना हिसका

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन संशोधन केंद्र व देवणी, लाल कंधारी या गोवंशाचे संशोधन केंद्र परळीला हलवून लातूरकरांना हिसका दिला.

Dhananjay Munde
माजी कृषी मंत्री सत्तार यांनीही लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र व्हायला हवे असे मत व्यक्त केले होते.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

प्रदीप नणंदकर

लातूर: मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन संशोधन केंद्र व देवणी, लाल कंधारी या गोवंशाचे संशोधन केंद्र परळीला हलवून लातूरकरांना हिसका दिला.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

या विषयावर लातूरकर चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. संपूर्ण देशात सोयाबीन उत्पादनात लातूर अग्रेसर आहे. लातूरहून सोयाबीन तेलाचे भाव ठरतात. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत लातूरच्या कृषी महाविद्यालयात सोयाबीन परिषद झाली होती, तेव्हा सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला व्हावे अशी मागणी पुढे आली होती व त्याला सकारात्मकता दर्शवण्यात आली होती. माजी कृषी मंत्री सत्तार यांनीही लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र व्हायला हवे असे मत व्यक्त केले होते. धनंजय मुंडे कृषी मंत्री होताच त्यांनी हे केंद्र परळीला हलवले आहे.

आणखी वाचा-‘पांचजन्य’ साप्ताहिकाकडून जुन्या संसद भवन इमारतीमधील आठवणींना उजाळा

लातूर जिल्ह्यातील देवणी हा तालुका व देवणी वंश संशोधन केंद्र मात्र परळीला हलवल्यामुळे देवणी तालुक्यातील मंडळीही अस्वस्थ झाली आहेत .माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासनाने हा निर्णय बदलला पाहिजे असे पत्र आपण शासनाला देणार असल्याचे लातूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले .जिल्ह्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर व जळकोट तालुक्यासाठी भरघोस निधी आणला लातूर जिल्ह्यासाठी आतापर्यंत सर्वाधिक निधी आपण आणला असल्याचा त्यांनी दावा केला आहे मात्र सोयाबीन संशोधन केंद्र व देवणी वंश केंद्र परळीला हलवल्यामुळे संजय बनसोडे हा आग्रह धरण्यात कमी पडल्याचे दिसते आहे. आमदार अमित देशमुख यांनी राज्य मंत्रिमंडळाला मराठवाड्यात लातूर आहे याचा विसर पडला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dhananjay munde shifted soybean research center and devani and lal kandhari cattle research center to parli print politics news mrj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×