सुहास सरदेशमुख
छत्रपती संभाजीनगर: ज्या दारावर ‘बाहेर’ किंवा इंग्रजीत ‘एक्झीट’ असे शब्द लिहिले आहे, त्या बाजूला पंकजा मुंडे यांना ढकलत नेण्याची प्रक्रिया गेली काही वर्षे सुरू आहे. ‘शिवशक्ती’ ही त्यांची धार्मिक कमी आणि राजकीय अधिक या स्वरुपाची ‘परिक्रमा’ संपल्यानंतर वैद्यनाथ साखर कारखान्यावरील १९ कोटी रुपयांच्या जप्तीच्या कारवाईने त्यांना या दाराच्या उंबरठ्यापर्यंत आणून साेडले आहे.
‘माझ्या अडचणी मी गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडेन’ असे पंकजा मुंडे यांना माध्यमांपुढे येऊन सांगावे लागत आहे. पण त्यांना अजून गृहमंत्र्यांची वेळ मिळालेली नाही. ‘जलयुक्त शिवार’ योजना लोकप्रिय असताना जलसंधारण मंत्रीपद काढून घेण्यापासून ते ऐन करोनाकाळात बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी मजुराची संघटना बांधणी करण्यासाठी आमदार सुरेश धस यांची नियुक्ती करण्यापर्यंतच्या राजकीय घडामोडींमुळे पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये सतत कोंडी करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक होत राहिले. कोंडी फोडण्याच्या त्यांच्या साऱ्या प्रयत्नांकडे भाजपतील पक्षनेतृत्वाने कधी लक्ष दिले नाही. पक्षकोंडीतील नेत्या ही त्यांची प्रतिमा अजून कायम आहे. नाराजीचे वर्तुळ आता फडणवीस ते अमित शहा असे विस्तारताना दिसत आहे.
हेही वाचा… कल्याणचा तिढा सुटला, ठाण्याचा संभ्रम कायम
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘आली रे आली, कोण आली- महाराष्ट्राची वाघिण आली’ अशा घोषणांनी पंकजा मुंडे यांची ‘संघर्ष यात्रा’ गाजत होती. तेव्हा राज्याच्या राजकारणात ‘वर नरेंद्र, खाली देवेंद्र’ असे घोषवाक्य समाजमाध्यमांमध्ये पेरले जात हाेते. त्याला प्रतिसादही मिळतो आहे, असे लक्षात आल्यानंतर पक्षांतर्गत ताकद उभी करण्यासाठी संघर्ष यात्रेतील जनसमुदाय देवेंद्र फडणवीस
पुढे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ खडसे
हेही वाचा… पुरानंतर नागपुरात पक्षीय राजकारण जोरात
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यापेक्षा गोपीचंद पडळकर हे भाजपचे ‘ बोलते’ नेते आहेत. अशा वातावरणात पंकजा मुंडे यांच्या ‘शिवशक्ती’ यात्रेचे स्वागत जानकर यांनी दणक्यात केले. कारण अजूनही ओबीसीच्या नेत्या ही पंकजा मुंडे यांची ओळख कायम आहे.
हे सारे सुरू झाले ते ‘जनतेच्या मनात मीच मुख्यमंत्री’ या चार शब्दांमुळे. हे शब्द पंकजा मुंडे यांनी उच्चारले होते का, याचे खुलासे त्यांनी केले आहेत. पण त्यांची सुप्त इच्छा मात्र दिसून येत असे. यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर धनंजय मुंडे
हेही वाचा… आठ वर्षांनंतर तुरुंगात सुटल्यावरही रमेश कदम यांचे मोहोळमध्ये वलय कायम
अगदी राष्ट्रीय राजकारणातून दोन महिन्यांची रजा घेऊन आणि ‘मौन’ पाळल्यानंतर ज्योर्तिलिंगाचे आणि साडेतीन शक्तीपीठाचे दर्शन घेणाऱ्या पंकजा मुंडे यांच्यावर लोकांनी मात्र फुलांची उधळण केली. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बहीण डॉ. प्रीतम मुंडे यांची जागा घेणार नाही, हेही त्यांनी अलीकडेच स्पष्ट केले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपण राज्याच्या राजकारणात राहण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे संकेत द्यायला सुरूवात केली आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर वस्तू व सेवा कराच्या न भरलेल्या रकमेवरुन मालमत्तेवर टाच आणण्याची कारवाई झाली. ही संगती बरेच काही सांगून जाणारी आहे. पूर्वी नाराजीची व्याप्ती देवेंद्र फडणवीस या नावापर्यंत मर्यादित असे. आता त्याचा विस्तार अमित शहा यांच्यापर्यंत जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilemma of pankaja munde in state politics continue print politics news asj