रत्नागिरी – खासदार नारायण राणे आणि भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील वाद आता उफाळून आले आहेत. भाजपाच्या या दोन नेत्यांमध्ये सुरु झालेल्या कुरघोडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजप पक्ष विखुरला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र यासर्व प्रकारामुळे जिल्ह्यात भाजपच्या नेत्यांमधील वाद आता चव्हाट्यावर येत असल्याने भाजप पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमा अवस्थेत पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा पक्ष आपले अस्तित्व वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना भाजप नेत्यांमध्ये नवीन वाद उफाळून आला आहे. खासदार नारायण राणे यांनी मेळाव्यातून भाजपचे कार्याध्यक्ष रविंदिर चव्हाण यांना कडक शब्दात इशारा देत, मी खासदार असेपर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी ढवळाढवळ करू देणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले. भाजपाच्या शहराध्यक्ष पदांच्या निवडीवरुन या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याने जिल्ह्याच्या राजकारणात हा चर्चेचा विषय बनला आहे.

भाजपाच्या शहराध्यक्ष पदासाठी १३ जणांचे अर्ज आले होते. मात्र चव्हाण यांनी एकाचीही मुलाखत न घेता ठाकरेच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शशिकांत मोदीं यांची पदासाठी निवड केल्याची तक्रार राणे समर्थक चित्रा चव्हाण आणि परिमल भोसले यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली. या तक्रारी नंतर नारायण राणे यांचा पारा चढल्याने त्यांनी थेट चव्हाण यांना आव्हान दिले. मात्र झालेल्या या सर्व प्रकारामुळे रत्नागिरी जिल्ह्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच भाजपमधील अंतर्गवाद आता चांगलेच चव्हाट्यावर आले आहेत.

रत्नागिरी शहरातील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झालेल्या रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यकर्ता मेळाव्याला काही कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील भाजपामध्येच दोन भाग पडल्याचे दिसून आले.

रत्नागिरी जिल्ह्यात पक्षातील दोन नेत्यांमध्येच वाद जुंपल्याने आता कार्यकर्ते देखिल संभ्रमावस्थेत सापडले आहेत. या दोन्ही नेत्यां मधील वाद वाढत जाण्याची शक्यता वर्तविली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप कार्याध्यक्ष चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या कोणतेही वाद नाहीत. सर्व आम्ही एकत्रित काम करीत आहोत. मात्र मेळाव्यात झालेला प्रकार हा गैरसमजातून झाल्याने राणे आणि चव्हाण यांच्यात वाद असल्याचे सांगितले जात आहे. – राजेश सावंत, रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष.