लातूर : केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चाकुरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि लातूर शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अधिक आनंद झाला. कारण विधानसभा निवडणूक आता तुल्यबळ होईल आणि त्यातून कॉग्रेसचे नेते अमित देशमुख यांना कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतील, असा युक्तीवाद आता सुरू झाला आह

शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे अतिशय निष्ठावान, सलग अकरा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. १२ व्या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील या सामाजिक कामात सहभागी होत्या. उदगीर येथे त्यांनी मोठे रुग्णालय उभे केले आहे. त्यामुळे सर्वसामांन्यामध्ये त्या परिचित आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विलासराव देशमुखांचे ज्येष्ठ पुत्र अमित देशमुख हे विजयी झाले आहेत. २००९ मध्ये ते प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत ते विजयी झाले. मात्र, मताधिक्य काही प्रमाणात घटले .लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख यांना पर्याय नाही अशी चर्चा असल्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना फारसे विचारात घेतले जात नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील अमित देशमुख निवडून येणारच असल्यामुळे कार्यकर्त्यांना पुरेसा सन्मान मिळत नसे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा… निवडणूक रायगडची प्रचार मात्र मुंबईत

निवडणूक झाल्यानंतर उर्वरित कालावधीत तो मिळण्याचे नेत्यांच्या मनात आले तर या श्रेणीत मोडणारे . त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. भाजपकडे अमित देशमुख यांना टक्कर देऊ शकेल असा प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्यामुळे अमित देशमुख एका अर्थाने निवांत आणि निर्धास्त हाेते. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्या आगामी विधानसभेत प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून राहतील अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे अमित देशमुख निवडणूक गांभीर्याने घेतील व स्थानिक कार्यकर्त्यांना योग्य तो मानसन्मान मिळेल अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. .निवडणुकीच्या निमित्ताने अमित देशमुख यांना कार्यकर्त्यांचे महत्त्व उमगेल या शक्यतेने कार्यकर्ते आनंदी झाले आहेत. महापालिकेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार, हे माहिती नाही. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला संधी मिळेल की नाही ,नव्यांना संधी देण्याच्या नादात जुने कार्यकर्ते, नगरसेवक हे अडगळीला पडत असल्याची भावना आहे. नवीन कार्यकर्त्याला संधी देण्याच्या नादात जुन्या अनुभवी कार्यकर्त्यांना विचारले जात नाही . अशा सर्व कार्यकर्त्यांमध्ये आता तुल्यबळ लढती होतील आणि कार्यकर्त्यांची किंमत वाढले असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा… प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीने सांगलीतील समीकरणे बदलणार ?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कॉग्रेसने प्रचारात जोर धरलाय होता, चाकूरकरांच्या व उदगीर मधील माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या भाजप प्रवेशाने कॉंग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण पसरत आहे.

Story img Loader