Premium

ईडीचा कचाट्यात तृणमूल काँग्रेसचा आणखी एक मंत्री; ममता बॅनर्जींच्या विश्वासू नेत्यावर कारवाई

तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि पदाधिकारी केंद्र सरकराचा विरोध करण्यासाठी दिल्लीत धडकल्याच्या दोनच दिवसांनंतर टीएमसीचे नेते आणि पश्चिम बंगालचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रथीन घोष यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

TMC-leader-and-Minister-Rathin-Ghosh
तृणमूलचे नेते, मंत्री रथीन घोष यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी. (Photo – PTI)

सक्तवसुली संचलनालयाने (ED) गुरुवारी (दि. ५ ऑक्टोबर) रोजी पश्चिम बंगालचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते रथीन घोष यांच्या संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर धाड टाकली. पश्चिम बंगालमधील महानगरपालिकेतील नोकर भरती घोटाळ्यामध्ये रथीन घोष यांचे नाव घेण्यात आले आहे. केंद्रीय यंत्रणेने २४ परगणा आणि कोलकातामधील काही ठिकाणीही छापेमारी केली असल्याची माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. अनेक महानगरापालिकांमध्ये नियमांचे उल्लंघन करून आणि पैशांच्या बदल्यात नोकर भरती घोटाळा झाला असल्याची माहिती बाहेर आल्यानंतर कलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची खोलवर चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर ईडीने या प्रकरणात हस्तक्षेप करत सदर कारवाई केली. ज्या महापालिकेमध्ये घोटाळा झाला, त्या महापालिकेवर २०१४ ते २०१९ या काळात रथीन धोष अध्यक्ष म्हणून काम करत होते, त्यामुळे त्यांची चौकशी होत असल्याची माहिती मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडीने केलेल्या आरोपानुसार, रथीन घोष हे मध्यमार्ग महापालिकेचे अध्यक्ष होते, त्या काळात सदर घोटाळा झाला. महापालिकेतील अनेक पदांची भरती काढून पैशांच्या बदल्यात नोकरी दिली गेली, असा आरोप करण्यात आला आहे. ईडी सदर घोटाळ्यातील पैशांच्या देवाणघेवाणीचा माग काढत आहे. तृणमूल काँग्रेस पक्षातील सध्या क्रमांक दोनचे नेते समजले जाणारे अभिषेक बॅनर्जी यांनी दोनच दिवसांपूर्वी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर ही कारवाई झाली आहे. केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजनांसाठीचा पश्चिम बंगालच्या वाट्याचा निधी दिला नाही, असा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या वतीने चलो दिल्लीचा नारा देण्यात आला होता. केंद्राकडून निधी मागण्यासह गेल्या काही काळापासून तृणमूलच्या नेत्यांविरोधात केंद्रीय यंत्रणांची जी कारवाई सुरू आहे, त्याबद्दलचा असंतोषही या आंदोलनातून खदखदत होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ed raids premises of west bengal minister and mamata loyalist rathin ghosh kvg

First published on: 05-10-2023 at 23:45 IST
Next Story
“कांशीराम एका पक्षाचे नाहीत”, दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसकडून ‘बसपा’पेक्षा जोरदार प्रयत्न