विदर्भातील ११ पैकी आठ जिल्हे भाजपच्या अधिपत्याखाली | Eight out of 11 districts in Vidarbha are under BJP rule print politics news amy 95 | Loksatta

विदर्भातील ११ पैकी आठ जिल्हे भाजपच्या अधिपत्याखाली

पालकमंत्र्यांच्या यादीत विदर्भातील ११ पैकी आठ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद हे भाजपकडे ठेवण्यात आले आहे.

विदर्भातील ११ पैकी आठ जिल्हे भाजपच्या अधिपत्याखाली
विदर्भातील ११ पैकी आठ जिल्हे भाजपच्या अधिपत्याखाली

चंद्रशेखर बोबडे

पालकमंत्र्यांच्या यादीत विदर्भातील ११ पैकी आठ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद हे भाजपकडे ठेवण्यात आले आहे. यावरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह लोकसभा निवडणुका गृहित धरून भाजपने विदर्भावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.विदर्भात एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूरसह सहा, मुनगंटीवार यांच्याकडील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ, वाशीम हे दोन जिल्हे तर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जळगावच्या (मराठवाडा) गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आले.

हेही वाचा >>> हुश्य.. सत्तार तर नाहीत ना? औरंगाबादकरांचा सुस्कारा

मंत्रिमंडळाच्या विस्तारापर्यंतची ही व्यवस्था आहे, मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावर सध्याचा अतिरिक्त पालकमंत्रीपदाचा कार्यभार संबंधित जिल्ह्यांच्या मंत्र्यांकडे दिला जाईल, असे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र तरीही आता पालकमंत्री नियुक्त करताना दोन्ही गटांना समानसंधी देणे अपेक्षित होते, असे शिंदे गटातील विदर्भाच्या एका नेत्याने सांगितले.

हेही वाचा >>> नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजपासह शिवसेनेला धक्का

शिंदे मंत्रिमंडळात फडणवीस, मुनगंटीवार हे भाजपचे तर संजय राठोड शिंदे गटाचे असे एकूण तीन मंत्री आहेत. अकरा जिल्ह्यांचे तिघांमध्ये समान वाटप होणे अपेक्षित होते. पण एकट्या फडणवीस यांना चक्का सहा जिल्ह्यांचे ( नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली,अकोला व अमरावती) पालकमंत्री करणे आश्चर्यकारक आहे. असा प्रकार आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातील हा पहिला प्रसंग असावा. भाजपचे दुसरे मंत्री सुधीर मनुगंटीवार यांच्याकडे चंद्रपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले. वास्तविक सुधीर मुनगटीवार सुद्धा ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याकडे पूर्व विदर्भातील अन्य जिल्ह्यांचे पालकमंंत्रीपद सोपवता आले असते. २०१४-२०१९ या काळात त्यांनी चंद्रपूरसह वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उत्तमरित्या सांभाळले होते. ठाकरे सरकारच्या काळात गडचिरोलीचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होते.

हेही वाचा >>> आजी-माजी खासदारांचा कलगीतुरा अन् भाजपचे ‘मिशन शिरूर’

एकूणच पालक्मंत्री नियुक्त करताना भाजपने विदर्भातील पक्षाच्या वर्चस्वाला धक्का पोहचू नये याची काळजी घेतानाच फडणवीस यांचे महत्व वाढवण्याचाही प्रयत्न केला. अमरावती,अकोला, वर्धा, भंडारा या जिल्ह्यात भाजप नेते गडकरी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हे येथे उल्लेखनीय.

“ठाकरे सरकारच्या काळात अनेक जिल्ह्यांत कमी निधी देण्यात आला, अनेक योजनांना स्थगिती देण्यात आली होती. तेथे स्थिरस्थावर करण्यासाठी व स्थगिती दिलेल्या योजनांना चालना देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद घेतले.शिंदे गटाचा सध्या एकच मंत्री विदर्भात आहे. त्यामुळे इतर ठिकाणचे पालकमंत्रीपद भाजपकडे येणे स्वाभाविक आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर चित्र बदलेल.”– गिरीश व्यास, माजी आमदार, प्रवक्ते भाजप

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नरेंद्र मोदींना दिलेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद

संबंधित बातम्या

दादा भुसेंच्या पुत्राच्या वाढदिवस फलकांनी भाजप अस्वस्थ
भाजप-संघनिष्ठ एकनाथ
सोलापुरात शिवसेनेकडे पक्षाऐवजी सत्तेचे निष्ठांवत अधिक
खासदारकी भूषवली, उच्चशिक्षित चेहरा; पण दिल्ली अबकारी कर धोरण गैरव्यवहारात नाव आल्याने के. कविता भाजपाच्या रडारवर
पूनम महाजन यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; भाजप नेत्यांनाही टोले

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपावाल्यांनी…”; शिवसेनेचा BJP सहीत CM शिंदेंवर हल्लाबोल
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण