एजाजहुसेन मुजावर

शिवसेनेत मोठे बंड करून सत्तेवर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेचा सोपान गाठल्यानंतर आता शिवसेना पक्ष संघटनेत मोठी फूट पाडून स्वतःची ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला. पंढरपुरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासोबतच शिवसेनेचा स्वतःच्या गटाचा मेळावा घेऊन एका दगडात अनेक पक्षी मारण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून आले. पंढरपूरच्या मेळाव्यातून एकनाथ शिंदे यांनी स्वतः गट वाढविण्यास सुरुवात करताना त्यास पश्चिम महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पंढरपुरात आषाढी वारीत विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट नवी दिल्लीहून पुणेमार्गे आले होते. पुण्यात त्यांचे झालेले जंगी स्वागत आणि त्यानंतर पंढरपुरात विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला जोडून घेतलेल्या स्वतःच्या गटाच्या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद, त्यानंतर मुंबईला रवाना होण्यापूर्वी सोलापुरात झालेले उत्स्फूर्त स्वागत, असा सारा माहोल शिंदेशाहीसाठी पुढच्या वाटचालीस दिशादर्शक ठरला आहे.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
married woman murder her son
सोलापूर : लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण उजेडात येऊ नये म्हणून विवाहितेने केला मुलाचा खून अन् स्वतः केले विषप्राशन

कोल्हापुरात बंडखोरांविरुद्ध शिवसैनिकांनी दंड थोपटले

राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४० आमदारांनी बंड करून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर या बंडाळीची चर्चा अद्यापि संपलेली नाही. तर उलट, शिवसेनेच्या संपूर्ण पक्ष संघटनेवरही वर्चस्व मिळविण्याच्या दृष्टीने पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, नवे-जुने शिवसैनिक फोडून स्वतःकडे आणण्यासाठी शिंदे पुढचे पाऊल टाकत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये चलबिचल सुरू असून त्यातील बहुसंख्य शिवसैनिकांना खेचून आणण्याची आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिल्लक राहिलेली शिवसेना आणखी खिळखिळी करण्याची खेळी शिंदे करू शकतात. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, नगर आदी जिल्ह्यांतील सेनेचे बहुसंख्य आमदार शिंदे यांच्या सोबत असताना त्या पाठोपाठ बऱ्याच माजी आमदारांनीही शिंदेशाहीच्या सत्तेच्या शामियानात जाणे पसंत केले आहे.

या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रस्थापित पदाधिकारी व शिवसैनिकांनी स्वतंत्र बैठका घेऊन आपली निष्ठा उध्दव ठाकरे यांच्यावर असल्याचे जाहीर केले आहे. अशा बैठकांना उपस्थित राहून कालपर्यंत उध्दव ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखविणारे काही शिवसैनिक आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जात असल्याचे चित्र सोलापुरात पाहायला मिळाले. सोलापूर महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे व महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी सभापती जुने निष्ठावंत शिवसैनिक तुकाराम म्हस्के व इतर काही मंडळींनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेत सुरू झालेली ही गळती येत्या काहीच दिवसांत आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. केवळ आमदारांना सोबत घेऊन चालणार नाही, तर पदाधिकारी व शिवसैनिकांच्या माध्यमातून पक्ष संघटनेची ताकद स्वतःकडे वळवून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांची पावले पडत असताना दुसरीकडे उध्दव ठाकरे हे पक्षाला सावरण्यासाठी आणि शिवसैनिकांना हिंमत देण्यासाठी मातोश्रीतून अद्यापि बाहेर पडले नाहीत. त्यामुळे ठाकरेप्रणित शिवसेनेत आलेली मरगळ थोपवून धरण्याचे आव्हान ठाकरे यांच्या समोर उभे राहिले आहे.

नाशिक शिवसेना मेळाव्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती, पण मनाचा थांग लागेना

पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मेळाव्यात त्यांनी केलेल्या भाषणात नवीन ताकद, उमेद आणि विश्वास होता. तेवढीच आक्रमकताही होती. उध्दव ठाकरे यांचे आव्हान आपण सहज पेलू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो, याविषयीचा आत्मविश्वास त्यांच्या भाषणात दिसून आला. अजून खूप काही बोलायचे आहे. वेळ आणलीच तर त्याचा आणखी ऊहापोह करीन, असा सूचक इशाराही शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना दिला आहे. ठाकरे शिंदेशाहीचे हे आव्हान परतून लावण्यासाठी प्रत्यक्ष रणांगणावर कसे उतरतात आणि पक्ष संघटना भक्कमपणे कशी बांधून ठेवतात, हे नजीकच्या काळात दिसणार आहे.