Eknath Shinde : महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षे काम केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री हे पद मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असणार की नाही? याबाबत शपथविधीच्या दोन तास आधीपर्यंत अनिश्चितता होती. एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना कडू घोट पचवावा लागला आहे असंच चित्र आहे. आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंसमोरची ( Eknath Shinde ) आव्हानं काय ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

शपथविधीला दोन तास उरलेले असताना उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत हे त्यांचा चेहरा स्पष्ट सांगतो आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या आठवड्यात दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याने लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतरही काहीशी उदासी ही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतीच. सत्ता कशी वाटायची? कुणाला किती खाती मिळणार? यावरुन भाजपा आणि एकनाथ शिंदेंमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या अखेर शपथविधीला दोन तास उरलेले असताना एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले आणि त्यांचा शपथविधी झाला.

Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”

हे पण वाचा- Photos : फडणवीसांची इच्छाशक्ती, अश्विनी भिडेंची नियुक्ती ते कमी चेंडूत जास्त धावा, एकनाथ शिंदेंचे १० महत्त्वाचे वक्तव्ये

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची उत्तम कामगिरी

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) शिवसेनेने चांगली कामगिरी केली. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत त्यांनी ५७ आमदार निवडून आणले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं जाईल अशी आशा होती. कारण सत्तास्थापनेचा कुठलाही फॉर्म्युला आधी ठरलेला नव्हता. दरम्यान भाजपाला विधानसभा निवडणुकीत १३२ जागा मिळाल्या. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचा होणार आणि ते नाव देवेंद्र फडणवीस असणार यावर शिक्कमोर्तबच होणं बाकी होतं जे चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर ४ डिसेंबरला जाहीर झालं. ज्यानंतर आज शपथविधी पार पडला. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे आता उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

२०२२ ला जास्त आमदार असूनही भाजपाकडे उपमुख्यमंत्रिपद

२०२२ चा विचार केला तर उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारुन एकनाथ शिंदे ४० आमदारांना बरोबर घेऊन आले. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात भाजपा महायुतीचं सरकार आलं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात असलं पाहिजे म्हणून त्यांना उपमुख्यमंत्री हे पद दिलं गेलं. भाजपाकडे तेव्हा १०५ आमदारांचं बळ होतं तरीही देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. त्यावेळी एकनाथ शिंदेंची भूमिका दुय्यम राहिल आणि प्रशासनावर पकड देवेंद्र फडणवीस यांची असेल असे अंदाज होते. मात्र एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी सक्षमपणे सरकार चालवलं आणि पक्षाची राजकीय स्थिती बळकट केली. पक्षावर आणि सरकारवर आपली पकड ठेवण्यात ते यशस्वी झाले.

एकनाथ शिंदेंनी विरोधकांना कामातून दिलं उत्तर

एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) अडीच वर्षांच्या कार्यकाळात एक उत्तम प्रशासक म्हणून काम केलं. एवढंच घडलं नाही तर विरोधकांनाही त्यांनी जागा दाखवून दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना कामांमधून उत्तरं दिली. माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी या योजना यशस्वीपणे राबवल्या त्यामुळे त्यांना विरोध करणाऱ्यांकडे फारसे काही मुद्दे उरले नाहीत. गद्दार हा शिक्का पुसण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेला मराठा आरक्षणाचा मुद्दाही योग्य पद्धतीने हाताळला. ८५ पैकी ५७ जागा एकनाथ शिंदेंनी जिंकल्याने खरी शिवसेना कुणाची हे लोकांनाही कळलं आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरेंकडून पक्ष हिसकावून घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. मात्र भाजपाला ज्या प्रचंड जागा मिळाल्या त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची ही त्यांच्यापासून किंचितशी लांब गेली आणि ते उपमुख्यमंत्री झाले. आता त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल ते त्याच जोमाने काम करण्याचं. तसंच आता कुठली खाती एकनाथ शिंदे मिळवणार हे देखील आव्हानच असणार आहे. तसंच कुणाला मंत्रिपदं द्यायची? हे देखील आव्हान एकनाथ शिंदेंसमोर असणार आहेच. येत्या महिन्याभरात महापालिका निवडणुका जाहीर होतील. त्यावेळी त्यांना उद्धव सेनेवर घाव घालण्यची आणखी एक संधी मिळणार आहे. त्या आव्हानालाही ते कसं समोर जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Story img Loader