जमीन घोटाळ्याप्रकरणी बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात बंद असलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आशीर्वाद घेतल्यानंतरच बसंत सोरेन यांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केल्यामुळे हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर २ फेब्रुवारी रोजी चंपाई सोरेन यांनी विशेष राजकीय परिस्थितीत स्थापन झालेल्या नव्या सरकारमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांच्याबरोबर राज्य विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि आरजेडीचे आमदार सत्यानंद भोक्ता यांनीही शपथ घेतली. हेमंत सोरेन न्यायालयीन कोठडीत असताना झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) पक्ष माजी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाशिवाय सध्याच्या राजकीय परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचा धाकटा मुलगा बसंत सोरेन आणि इतर सात आमदारांनी शुक्रवारी चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नवीन सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. बसंत सोरेन हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे धाकटे भाऊ आहेत. हेमंत सध्या कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. झारखंडच्या १२ सदस्यीय मंत्रिमंडळात झारखंड मुक्ती मोर्चाचे चाईबासचे आमदार दीपक बिरुआ आणि बसंत सोरेन यांचा समावेश करण्यात आला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचा धाकटा मुलगा बसंत सोरेन हे पक्षाच्या युवा शाखेचे प्रमुख आहेत. त्यांचा राजकीय प्रवास दुमका येथून सुरू झाला, जेव्हा मोठा भाऊ हेमंत २००५ मध्ये राज्याच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत तेथून लढले. पण तेव्हा हेमंत पराभूत झाले, परंतु त्यांच्या प्रचारात सहभागी असलेल्या बसंत यांनी त्यातून धडे गिरवले. २०२० मध्ये बसंतने दुमका येथून पोटनिवडणूक जिंकून राज्य विधानसभेत प्रवेश केला, कारण हेमंत यांनी या मतदारसंघावरचा दावा सोडला होता, डिसेंबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हेमंत बरहैतमधूनही विजयी झाले होते. कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांनी आपल्या मतदारसंघात वारंवार भेट दिली आणि लसीकरणाच्या प्रयत्नांना मदत केली. जिल्हा प्रशासनाच्या एका सूत्राने नंतर सांगितले की, “आदिवासींमध्ये लसींबाबत खूप संकोच होता. याचा सामना करण्यासाठी आम्ही शिबिरे आयोजित केली आणि बसंत सोरेन यांनी आम्हाला लसींचे महत्त्व लोकांना समजावण्यास सांगितले. आमदार निधीतून त्यांनी आम्हाला काही ब्लॉक्समध्ये तैनात असलेल्या दोन रुग्णवाहिका खरेदी करण्यास मदत केली.

ramdas athawale Yogi Adityanath 1
“रावण डॅशिंग होता म्हणून…”, पटोलेंच्या आदित्यनाथांवरील टीकेला आठवलेंचं उत्तर; म्हणाले, “रावणाने लंका जाळली…”
Swati Maliwal has accused Delhi CM Arvind Kejriwal
केजरीवालांच्या घरी ‘आप’ च्या महिला खासदारांना मारहाण; कारण काय? कोण आहेत स्वाती मालीवाल?
Devendra Fadnavis
“सदाभाऊ यावेळी संधी पक्की, पण पुढच्या वेळी…”; देवेंद्र फडणवीसांचं शिंदे गटाच्या नेत्याबाबत मोठं विधान
Uddhav Thackeray reply to BJP regarding merger of Shiv Sena with Congress Pune print news
‘काँग्रेसमध्ये विलीन होण्यास शिवसेना छोटा पक्ष नाही,’ उद्धव ठाकरे यांचे भाजपला प्रत्युत्तर
Supriya Sule on Ajit Pawar at baramati rally
“करारा जवाब मिलेगा…”, सुप्रिया सुळेंचा बारामतीमध्ये इशारा; म्हणाल्या, “उद्रेक होईल…”
Ganesh Naik, Thane, eknath shinde,
गणेश नाईक यांची ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांना भेटलो, हस्तांदोलन झाले आणि…
prajwal revanna case
Scandal: “प्रज्ज्वल रेवण्णाला भगवान कृष्णाचाही रेकॉर्ड मोडायचा होता”, काँग्रेसच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान
after month BJP and NCP active in campaigning in Maval Ajit Pawar and Parth Pawars attention on every development
पिंपरी : अखेर महिनाभरानंतर मावळमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात सक्रिय; प्रत्येक घडामोडीवर अजित पवार, पार्थ पवारांचे लक्ष

माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना मुर्मू सोरेन म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या सर्व नवनियुक्त मंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन, त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देते. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने राज्य सरकार झारखंडमधील लोकांना हक्क मिळवून देण्याच्या आपल्या महामोहिमेला आणखी गती देईल, अशी माझी इच्छा आहे. मंत्री बसंत सोरेन यांनी पत्रकारांना सांगितले की, ” सध्या आम्ही चढ-उताराच्या परिस्थितीतून जात आहोत. आम्ही हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक लढवू आणि एका राजकीय पक्षाचा सफाया करू.” हेमंत न्यायालयीन कोठडीत असताना बसंत हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचारात JMM चा प्रमुख चेहरा असतील.

हेही वाचाः एकीकडे दिल्लीत बळीराजा आक्रमक, दुसरीकडे युतीच्या चर्चा; शेतकरी आंदोलनाचा परिणाम SAD-BJP युतीवर होणार?

एप्रिल २०२१ मध्ये तणावपूर्ण मधुपूर पोटनिवडणुकीत बसंत यांनी आपली छाप पाडली होती. कोविड १९ मुळे सप्टेंबर २०२० मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे हाजी हुसेन अन्सारी यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक आवश्यक होती. महागठबंधनने अन्सारी यांचा मुलगा हफिझुल हसन यांना उमेदवारी दिली, जो आधीच मंत्री होता. पण या मोहिमेचे नेतृत्व बसंत यांनी केले आणि राजकीय निरीक्षकांनी ही त्यांच्या राजकीय क्षमतेची परीक्षा असल्याचे सांगितले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दुमका आणि बर्मोमध्ये दोन पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने भाजपा मधुपूर जिंकण्यासाठी आतुर झाला होता. प्रचारासाठी भाजपाने माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी आणि रघुबर दास, राज्यसभा खासदार दीपक प्रकाश आणि गोड्डा खासदार निशिकांत दुबे यांसारख्या दिग्गजांना मैदानात उतरवले होते.

हेही वाचाः निवडणूक रोखे योजनेविरुद्ध दंड थोपटणारी काँग्रेसची ‘ती’ रणरागिणी कोण?; शेवटपर्यंत दिला न्यायालयीन लढा!

हसनने निवडणूक जिंकल्यानंतर बसंतच्या प्रचारात सहभागी असलेले एक ज्येष्ठ आमदार म्हणाले, “तो (बसंत) संथाली भाषेत बोलला आणि त्याने मतदारांचे हृदय जिंकले. वडील शिबू सोरेन यांनी जे मिळवले होते, त्यासाठी मतदारांना लढायचे त्यांनी आवाहन केले. त्यांचे संथाली वक्तृत्व उत्कृष्ट आहे. त्यांचा मोठा भाऊ हेमंत आणि पक्षाचे वरिष्ठ चंपाई सोरेन त्यांच्यापेक्षा चांगली संथाली भाषा ते बोलतात. बसंत तेव्हापासूनच पक्षाच्या कार्यात अधिकाधिक सक्रिय होत गेले. दुमका येथे आमदार म्हणून त्यांचे काम सुरूच आहे, ज्यात विविध प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये दुमका येथील ननबिल नदीवरील सिंचन बॅरेजसाठी १०० कोटी मंजूर केलेत.

बसंत सोरेन यांचा जन्म १ सप्टेंबर १९७७ रोजी रामगढ जिल्ह्यातील नेमरा गावात झाला. वडील शिबू सोरेन आणि आई रुपी सोरेन किस्कू यांच्या पोटी जन्मलेल्या बसंतने १९९३ मध्ये त्याच भागातील अमरपूर हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. वडील शिबू यांचे जीवन संघर्षाने भरलेले असल्याने आणि कुटुंबाची गरीब आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही आणि ते गावातील शेती आणि घर सांभाळण्यात व्यस्त झाले. पण संपूर्ण कुटुंब झारखंडच्या वेगळ्या राज्याच्या आंदोलनासाठी समर्पित होते. मोठा भाऊ दुर्गा सोरेन आणि मधला भाऊ हेमंत सोरेन यांनी लहानपणापासूनच झारखंड चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली. झारखंड स्वतंत्र राज्याच्या निर्मितीनंतर वडील शिबू सोरेन यांची अटक आणि मोठा भाऊ दुर्गा यांच्या अकाली निधनाने संपूर्ण कुटुंबावर दु:ख कोसळले. यानंतर बसंत सोरेन यांनीही कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याबरोबरच पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली.

खरं तर तो गुरुजी (शिबू सोरेन) यांचा मुलगा असल्याने बसंत यांना इतर आमदारांपेक्षा जास्त प्राधान्य मिळते, असा दावा करताना जेएमएमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, तो अद्याप पूर्णपणे परिपक्व झालेला नाही. काही जणांनी त्याच्या बालिश स्वभावाची तक्रारही केली आहे. एकदा त्यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते, तेव्हा कार्यक्रमाला उपस्थित असलेले तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत यांनी आपल्या भावाचा सार्वजनिकपणे बचाव केला होता, परंतु आतल्या सूत्रांनी सांगितले होते की त्यावेळी बसंत यांना बंद दरवाजाआड फटकारण्यात आले होते.