मुंबई : आझाद मैदानावर गुरुवारी महायुती सरकारच्या पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी चक्क पाठ फिरवली होती. सरकारातील दुसरा घटक पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पाठीराखे या सोहळ्याला तुरळक प्रमाणात होते. शपथविधी समारंभावर सारी छाप ही भाजपची होती. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना यशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींची उपस्थिती मोठी होती.

हेही वाचा >>> Maharashtra CM Swearing Ceremony : ‘मी पुन्हा येईन’ अखेर प्रत्यक्षात; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिमाखदार शपथविधी सोहळा

Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; महायुतीच्या आमदारांशी साधणार संवाद
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन

शपथविधी समारंभासाठी चार मंडप होते. त्यांचे कापड भगवे होते. अगदी स्टॉलसुद्धा भगव्या कापडाचे होते. मंडपामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, बिरसा मुंडा, दीनदयाळ उपाध्याय, बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या प्रतिमा लावल्या होत्या. मैदान परिसरात महायुतीच्या तिन्ही पक्षांचे झेंडे होते, तरी उपस्थितांमध्ये बहुतांश कार्यकर्ते केवळ भाजपचे होते. ‘एक है तो सेफ है’ घोषणेचे टी- शर्ट परिधान केलेले कार्यकर्ते हजरोंच्या संख्येत होते. कार्यकर्त्यांच्या हाती ‘देवाभाऊ’ लिहिलेले फलक होते. नरेंद्र मोदी यांचे मुखवटे लाऊन अनके कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी होते.

हेही वाचा >>> Maharashtra CM Swearing Ceremony : ‘मी पुन्हा येईन’ अखेर प्रत्यक्षात; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिमाखदार शपथविधी सोहळा

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज गुलाबी जॅकेट्स परिधान केली होती, तरी लाडक्या बहिणी कमळ चिन्हाच्या भगव्या साडीत आल्या होत्या. घड्याळाचा कार्यकर्ता क्वचित दृष्टीस पडत होता. उपस्थितांमध्ये मुंबईतील आणि त्यातही हिंदीभाषक महिला-पुरुष यांचा मोठा भरणा होता. मैदानावर धूळ असल्याने प्रवेशदारी मास्क दिले जात होते.

Story img Loader