सिद्धेश्वर डुकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: राज्यात २०१९ नंतर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांत ‘पंढरपूर’चा अपवाद वगळता सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीने भाजपवर मात केली होती. हीच परंपरा ‘कसबा’ आणि ‘चिंचवड’ विधानसभा पोटनिवडणुकीत राहणार का, याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत अखेरच्या क्षणी माघार घेतेलेल्या भारतीय जनता पक्षाला आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन दिवंगत सदस्यांच्या रिक्त जागा बिनविरोध निवडून द्याव्यात अशी अपेक्षा आहे. मात्र देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर पोटनिवडणुकांत मविआ आणि भाजप यांच्यात चुरशीच्या लढती झाल्या होत्या.

हेही वाचा… औरंगाबाद शिक्षकमधील भाजपची मरगळ दूर

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अंधेरीपूर्व पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांचा जोरदार प्रचार सुरु केला. मात्र, ऐनवेळी मुरजी पटेल यांना या निवडणुकीत पराभव होण्याचे संकेत मिळाल्यानेच माघार घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला असा आक्षेप मविआकडून घेतला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात पाडलेली उभी फूट व त्यास असलेले भाजपाचे छुपे समर्थन यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विषयी निर्माण झालेली सहानुभूती यामुळे पराभव होईल या भितीने पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की भाजपवर ओढवली.

हेही वाचा… शरद पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम विचारवंत परिषद

देगलूर मतदारसंघात तत्कालीन आमदार रावसाहेब अंतापूरकर आणि पंढरपूर-मंगळवेढा आमदार भारत (नाना) भालके यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाल्या तेव्हा दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपची मनधरणी केली होती. मात्र भाजपचे त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याला नकार दिला होता. मात्र या दोन्ही ठिकाणी निवडणुका झाल्या.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : नांदेडमध्ये ऑनर किलिंग; वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीचा खून करून राख विसर्जित; इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

देगलूरमध्ये भाजपने उमेदवार देताना शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना शिवसेनेतून फोडून निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश यांच्याविरोधात भाजपने २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार असलेले सुभाष साबणे यांना तिकीट दिले तरीही १ लाख आठ हजार मते घेऊन जितेश अंतापूरकर विजयी झाले.

हेही वाचा… विश्लेषण : जादूटोणा विरोधी कायदा काय आहे? त्याला साधूंचा विरोध का?

पंढरपूरमध्येही भाजपने तेच धोरण राबवले. भाजपने शिवसेनेचे नेते समाधान आवताडे यांना राष्ट्रवादीचे उमेदवार भागीरथ भालके यांच्या समोर उभे करून त्यांचा पराभव केला होता. अवताडे यांनी भालके यांचे चिरंजिव भगिरथ यांचा पाच-साडेपाच हजार मतांनी पराभव केला होता. भाजपला हे यश मिळाले.मविआवर या पोटनिवडणुकीत मात करायची संधी भाजपने साधली. पोटनिवडणुकीत आतापर्यतचे भाजपचे ऐकमेव यश आहे.

हेही वाचा… शरद पवारांसदर्भात केलेल्या विधानावर प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “ते वक्तव्य मी…”

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. तर, भाजपने सत्यजित कदम यांना या निवडणूकीत उतरवले. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे कोल्हापूरचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला होता.

हेही वाचा… नागपूरमध्ये तिरंगी लढतीत भाजपापुढे कडवे आव्हान; फडणवीस, गडकरी, बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला

भाजपने पंढरपूर जिंकले. मात्र महाविकास आघाडीसमोर देगलूर आणि कोल्हापूर उत्तर गमावले. तर अंधेरी पूर्व सपशेल माघार घेतली. आता कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजप व मविआत चुरस वाढणार,हे मात्र निश्चित आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात कसबा पेठमधुन माजी महापौर मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघांतून लक्ष्मण जगताप विजयी झाले होते. लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांनी नंतर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे चिंचवडची जागा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसणार,हे निश्चित आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Except pandharpur bjp is on backfoot in all by elections against maha vikas aghadi print politics news asj
First published on: 27-01-2023 at 13:51 IST