मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अनुभवाचा मला मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात फायदा झाला होता.. आता माझ्या अडीच वर्षांच्या अनुभवाचा फडणवीस यांना नक्कीच फायदा होईल, असा दावा नवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुख्यमंत्री असताना मी कॉमन मॅन (सीएम) म्हणून काम केले. आता ‘डेडिकेटेड (सर्मपित) कॉमन मॅन’ (डीसीएम) म्हणून काम करणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> तीन ताल… फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पवारांचा सहावा विक्रमी शपथविधी

आझाद मैदानावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधी झाल्यानंतर शिंदे यांनी बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी त्यांनी रिगल सिनेमा चौकातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी माझे नाव फडणवीस यांनी सुचविले होते. आता मी त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविले याचा आनंद वाटत आहे. असे सांगून शिंदे यांनी महायुती सरकार हे यशस्वी व गतिमान ठरले आहे. अडीच वर्षांत आम्ही केलेली कामे ही ‘न भूतो न भविष्यति’ आहेत. त्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. आम्ही ४० आमदार होतो त्याचे ६० झाले आहोत. ही आमच्या कामाची पोचपावती आहे. अडीच वर्षांचे हे सरकार जनतेचे सरकार होते. याचे मला समाधान आहे असे शिंदे यांनी सांगितले