Who is Abhimanyu Kohar: खानौरी येथे एका वर्षांहून अधिक काळ चालेल्या शेतकरी आंदोलनाला एक नवीन नेता मिळाला आहे. ३१ वर्षीय अभिमन्यू कोहर हा इंजिनिअरींगचा विद्यार्थी राजकारणात आणि नंतर शेतीत उतरला. केंद्र सरकारशी चर्चा करणाऱ्या शेतकरी शिष्टमंडळात अभिमन्यूही सामील असतो. शेतकरी नेते जगजीत सिंग दलेवाल यांच्या खांद्याला खांदा लावून अभिमन्यू लढत आहे. पंजाब-हरियाणा सीमेवर खानौरी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी रोज माध्यमांना माहिती देण्यात त्याचा पुढाकार असतो.

२०२०-२१ मध्ये तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनानंतर ४० सदस्यांची संयुक्त किसान मोर्चा समिती स्थापन करण्यात आली होती. अभिमन्यू या समितीचाही भाग होता. परंतु आता अभिमन्यूला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. २३ पिकांना हमीभाव मिळण्यासाठी सरकारची सहमती आवश्यक असल्याचे ते आंदोलनकारी शेतकऱ्यांना समजावून सांगत असतात.

कोहर उच्चशिक्षित असल्यामुळे हिंदी आणि इंग्रजीमध्ये ते सहज संवाद साधतात त्यामुळेच संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) या बिगर राजकीय संघटनेने त्यांना प्रवक्तेपद बहाल केले आहे. आंदोलनातील इतर नेते जेव्हा माहिती सांगताना अडखळताना दिसतात, तिथे कोहर यांना सगळी आकडेवारी मुखोद्गत असते. कोहर यांनी २०१६ रोजी मुर्थळ येथील दीन बंधू छोटू राम विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांना एका बहुराष्ट्रीय कंपनीकडून मोठ्या पगाराची नोकरी चालून आली होती, मात्र त्यांनी त्यास नकार दिला. कोहर म्हणतात, “मी नोकरी करण्यास नकार दिला होता. कारण तोपर्यंत विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून मी पुढे आलो होतो, त्यामुळे मी शेतकरी राहणेच पसंत केले.”

कोहर यांच्या मते, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचित एनडीए सरकारने भूसंपादन अध्यादेश जाहीर केल्यानंतर लगेचच हरियाणातील शेतकऱ्यांबरोबर काम करण्यास सुरुवात केली होती. याबद्दल कोहर सांगतात की, “सदर अध्यादेश आल्यानंतर मी खासगी क्षेत्रात नोकरी न करता शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला होता.” २०२०-२१ साली शेतकरी आंदोलनादरम्यान, कोहर यांनी शिवकुमार क्का यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाच्या युवा शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम केले. २०२२ मध्ये भारतीय किसान नौजवान युनियनची स्थापना झाल्यानंतर या संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले.

एसकेएम संघटनेच्या मागण्या काय आहेत?

बिगर राजकीय संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चा (SKM) संघटनेच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात माहिती देताना कोहर म्हणाले, २३ पिकांना कायदेशीर हमीभाव मिळावा आणि हमीभावाच्या खाली खरेदी करणाऱ्यांना शिक्षा व्हावी. खासगी खरेदीदार साखळी तयार करून हमीभावापेक्षा कमी दरात मका आणि कापूस खरेदी करतात. केंद्र सरकारशी सुरू असलेल्या चर्चेत आम्ही याच मागण्या प्रामुख्याने मांडत आहोत. तसेच १९ मार्च रोजी आमच्या पुढील बैठकीत या मागण्या पुन्हा मांडणार आहोत.

२३ पिकांना कायदेशीर हमीभाव दिला तर त्यामुळे १७ लाख कोटी रुपये खर्च होतील, तसेच बाजारपेठ विस्कळीत होईल आणि व्यापाऱ्यांना या व्यवसायातून बाहेर पडावे लागेल, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. या टीकेला उत्तर देताना कोहर म्हणाले, आम्ही या टीकेला २२ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या समितीबरोबर झालेल्या बैठकीत उत्तर दिले आहे. या युक्तीवादाचाही आम्ही विरोध करतो. एमएसपी लागू केल्यास अतिरिक्त वार्षिक खर्च सुमारे २५ ते ३० हजार कोटी असण्याची शक्यता आहे.

याशिवाय कोहर रिझर्व्ह बँकेच्या अहवालाचेही उदाहरण देतात. अन्नधान्याला किरकोळ बाजारात सर्वात शेवटी जो भाव मिळतो, त्यापेक्षा फक्त ३० टक्के पैसे शेतकऱ्यांना मिळतात, असे आरबीआयने अहवालात म्हटल्याचे कोहर सांगतात.

शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या किसान मजदूर मोर्चातील घटक संघटना असलेल्या बीकेयू शहीद भगत सिंग संघटनेचे प्रवक्ते तेजवीर सिंग म्हणाले की, कोहर यांनी इतर तरुणांना आकर्षित केले आहे. कोहर हरियाणातील जाट तरूण आहे. तो खानौरी सीमेवरही हरियाणाच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत होता.

Live Updates