काश्मीर प्रश्न केवळ चर्चेने सोडवला जाऊ शकतो, असं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अल अरबिया वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. दरम्यान, त्यांच्या या विधानाचं जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी समर्थन केले आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशातील चर्चा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. ‘रॉ’चे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांच्या ‘अ लाइफ इन द शैडोज’ या पुस्तकाच्या प्रकाश सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.
हेही वाचा – संघाने मुस्लीम समाजावर अटी लादू नयेत; उर्दू माध्यमे व्यक्त करतायत चिंता
काय म्हणाले फारुख अब्दुल्ला?
काश्मीर प्रश्न चर्चेने सोडवला जाऊ शकतो. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेऊन पाकिस्तानशी चर्चा करावी. जोपर्यंत काश्मीर प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत दहशतवादही संपणार नाही. त्यामुळे दोन्ही देशांना चर्चेतूनच काश्मीर प्रश्न सोडवावा लागेल, अशी प्रतिक्रिया फारुख अब्दुल्ला यांनी दिली. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्याही हीच इच्छा होती, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, युद्ध हे कोणत्याही समस्येचं समाधान नाही, असं प्रतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. युक्रेनमध्ये काय सुरू आहे? हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज भारत जी२० परिषदेचं नेतृत्व करतो आहे, मला आशा आहे की पंतप्रधान मोदी पाकिस्तानबरोबर चर्चा करण्यासंदर्भात सकारत्मक विचार करतील. कारण हाच एकमेव मार्ग आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना ‘रॉ’चे माजी प्रमुख ए एस दुलत यांनीही अब्दुल्ला यांच्या मताशी सहमती दर्शवली. “पाकिस्तानशी चर्चा केल्याशिवाय दहशतवाद संपणार नाही. दहशतवाद हा सीमेपलीकडून येतो.”, असे ते म्हणाले.