दिल्लीमध्ये सणांचा महिनाभराच्या हंगामाला दसऱ्यापासून सुरुवात होते. त्यानंतर दिवाळी येते आणि हंगामाची सांगता छठपूजेने होते. लोकांसाठी सणासुदीत आनंद व्यक्त करण्याची, व्यापाऱ्यांसाठी पैसा कमावण्याची आणि दिल्लीतील लोकप्रतिनिधींसाठी राजकीय पोळ्या भाजण्याची संधी मिळते. दिवाळीच्या धावपळीत फटाक्यांच्या बंदीवर राजकारण करण्याआधी दसऱ्याच्या दिवशी रामलीलेत सहभागी होताना राजकारणी दिसतात. गेल्या काही वर्षांत आम आदमी पार्टी (आप) आणि दिल्ली भाजपमध्ये छठ पूजेदरम्यान संघर्षही झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर्षी, ज्याला ‘उत्सवाचे राजकारण’ म्हणता येईल ते आधीच सुरू झाले आहे. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी दिवाळीदरम्यान दिल्लीत फटाक्यांच्या बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईशान्य दिल्लीचे खासदार म्हणाले, “पुन्हा एकदा, (दिल्लीचे मुख्यमंत्री) अरविंद केजरीवाल यांनी औरंगजेबाप्रमाणेच मनमानी ब्लँकेट बंदी घातली. कोविड १९ च्या धक्क्यानंतर व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे कारण यामुळे त्यांच्या उपजीविकेला बाधा येईल.”

प्रदूषणाचे कारण देत दिल्ली सरकारने १ जानेवारी २०२३ पर्यंत ग्रीन फटाक्यांसह सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादनावर, विक्रीवर आणि वापरावर पूर्ण बंदी घातली आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी याआधी सांगितले की, “हिवाळ्यात दिल्लीचे प्रदूषण बिघडवण्यात फटाक्यांमधून उत्सर्जन हा एक महत्त्वाचा घटक असल्याचे दिसते. अशी परिस्थिती पाहता सर्व प्रकारच्या फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी घालण्यात येत आहे, जेणेकरून लोकांचे प्राण वाचू शकतील.

परंतु, फटाके वाजवणे हे प्रदूषणाचे प्रमुख कारण नसल्याचा दावा तिवारी यांनी केला. “अन्य अनेक घटक आहेत ज्यांना नियंत्रित करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये पेंढा जाळणे समाविष्ट आहे. आता आम आदमी पक्षाकडे पंजाबमध्ये सत्ता नाही आणि त्यामुळे ते काहीही करू शकत नाही, अशी सबब नाही. भाजपा खासदार म्हणाले की सरकार कमीत कमी प्रदूषण करणाऱ्या ग्रीन फटाक्यांना परवानगी देऊ शकते. एका समुदायाला खूश करण्यासाठी हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांच्या सणांना लक्ष्य का केले जात आहे? असा सवाल तिवारी यांनी केला.

गेल्या वर्षीही दिल्ली सरकारने १ जानेवारी २०२२ पर्यंत फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली होती, त्याला भाजपाच्या काही नेत्यांनी विरोध केला होता. त्यापैकी कपिल मिश्रा यांचाही आरोप होता की, “हिंदूंना टार्गेट करणे सर्वात सोपे आहे. “मात्र, फटाक्यांवर बंदी आणणारे ‘आप’च्या नेतृत्वाखालील प्रशासनाने एकटेच नाही. शेजारील हरियाणा, ज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र एनसीआरमधील १४ जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवर किंवा वापरावर बंदी घातली आहे, तर उत्तर प्रदेशने दिवाळीला फक्त दोन तासांसाठी पर्यावरणाला हानिकारक नसलेले फटाके वापरण्यास परवानगी दिली आहे. 

या निर्बंधांना न जुमानता दिल्ली, नोएडा, फरिदाबाद आणि गुरुग्राममध्ये रात्री उशिरापर्यंत लोक फटाके फोडतात. परिणामी उत्सर्जनाने राष्ट्रीय राजधानीचा २४ तासांचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक दुसऱ्या दिवशी ४६२ वर ढकलला गेला जो पाच वर्षांतील सर्वोच्च आहे. दसऱ्याभोवतीचे राजकारण हे सण साजरे करण्यावरूनच जास्त आहे. विविध पक्षांचे राजकारणी रामलीलाला भेट देतात आणि काहीजण त्यात सादरीकरणही करतात. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून राजधानीतील नवरात्र मंडळांना भेट दिली आहे.

मनोज तिवारी, गोरखपूरचे खासदार रवी किशन, माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि आप नेते ब्रजेश गोयल यांनी रामलीलामध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. या वर्षीही केंद्रीय कॅबिनेट मंत्री अश्विनी कुमार चौबे, फग्गन सिंग कुलस्ते आणि अर्जुन राम मेघवाल लाल किल्ल्यावरील लवकुश रामलीलामध्ये सहभागी होणार आहेत. चौबे, पर्यावरण राज्यमंत्री हे ऋषी वशिष्ठ यांची भूमिका साकारणार आहेत, तर राज्यमंत्री स्टील फग्गनसिंग कुलस्ते निषाद राज यांची भूमिका करणार आहेत. मेघवाल, संसदीय कामकाज आणि संस्कृती राज्यमंत्री, भजने गातील. लवकुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी सांगितले की तिवारी केवटची भूमिका साकारणार आहेत, रामायणातील एक पात्र ज्याने राम, सीता आणि लक्ष्मण यांना बोटीतून गंगापार नेले जेव्हा तिघे वनवासात गेले.

छठ पूजेला राष्ट्रीय राजधानीतील राजकारणाशी जोडले गेले आहे कारण शहराच्या ३० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या पूर्वांचलांच्या प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजच्या सर्वेक्षणानुसार, राजधानीतील ७० पैकी १६ विधानसभा जागांवर पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक बहुमतात असल्याचे मानले जाते.

कोविड-१९ साथीपूर्वी, दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकेचे (एमसीडी) प्रभारी भाजप नेते या दोघांनी छठ घाट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले. गेल्या काही वर्षांमध्ये, छठ पूजेवरून भाजप आणि आपचे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत, दोन्ही पक्ष पूर्वांचल विरोधी असल्याचा आरोप करत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Festival time is the best time for political parties in delhi pkd
First published on: 27-09-2022 at 15:31 IST