छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसमधून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात आणि तेथून उडी मारत माजी आमदार नितीन पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. नितीन पाटील गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात होते. कन्नड विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीस इच्छुक आहेत. या पक्षांतरामुळे महायुतीमधील जागावाटपाची बोलणी पुढे सरकल्याचे संकेत मिळत आहेत.

कन्नड मतदारसंघ सध्या उद्धव ठाकरे यांचे समर्थक उदयसिंह राजपूत यांच्या ताब्यात आहे. जिल्ह्यातील एकमेव निष्ठावंत आमदार अशी त्यांची ओळख ठाकरे गटाचे शिवसैनिक मिरवत असतात. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट अशी लढत व्हावी असे संकेत मिळू लागले आहेत. याच मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव दानवे – पाटील याही प्रचार करत आहेत. त्यामुळे कन्नडची निवडणूक बहुरंगी होईल, असे चित्र निर्माण होत आहे. कन्नड मतदारसंघातून उदयसिंग राजपूत यांनी २०१९ च्या निवडणुकीमध्ये ७८ हजार ७३८ मते मिळवत हर्षवर्धन जाधव यांचा १८ हजार ४४० मतांनी पराभव केला होता. हर्षवर्धन जाधव यांना ६० हजार २९८ मते मिळाली होती. १९८० मध्ये हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव यांनी २३ हजार १४४ मते घेऊन विजय मिळवला होता. त्यानंतर पुन्हा १९९०, १९९५ ते निवडून आले होते.

Rajendra Raut, Manoj Jarange patil ,
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव, आमदार राजेंद्र राऊत यांचा पुन्हा हल्ला
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Chandrashekhar bawankule criticises Maha vikas Aghadi, Nagpur, Bharatiya Janata Yuva Morcha, Maha vikas Aghadi, Shivaji Maharaj, Chandrashekhar Bawankule,, protest, Uddhav Thackeray, Sharad Pawar,
महाविकास आघाडी महाराष्ट्राला कलंकित करीत आहे, बावनकुळेंची टीका
Ajit Pawar meeting in Katol assembly constituency on 31st August
अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची ३१ला सभा, काय बोलणार?
Sharad Pawar protest pune,
बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात शरद पवार, सुप्रिया सुळेंचे मूक आंदोलन सुरू, महाविकास आघाडीतील नेतेमंडळी सहभागी
It will be decided on Friday whether Samarjitsinh Ghatge will join Sharadchandra Pawar NCP
समरजितसिंह घाटगे यांची भूमिका उद्या ठरणार
Mumbai mallikarjun kharge marathi news
“मोदीशहांच्या हाती महाराष्ट्र देऊ नका!”, मल्लिकार्जुन खरगे यांचे आवाहन
conflict between bjp and uddhav Thackeray
सावंतवाडी: भाजपा – उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये बाचाबाची

हेही वाचा – भाजपच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, अनिल देशमुख पुत्राने भाजपला सुनावले

हेही वाचा – कोण असेल प्रशांत किशोर यांच्या नव्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष; राजद, जेडीयू नि भाजपाला या पक्षाविषयी काय वाटतं?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेलेले नितीन पाटील यांनी १९९९ मध्ये काँग्रेसध्ये असताना ४१ हजार ०४९ मते घेऊन विजय मिळवला होते. त्यांचे वडील सुरेश पाटील हे अनेक वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. काँगेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नितीन पाटील यांना लोकसभा निवडणुकीमध्येही उमेदवारी दिली होती. या निवडणुकीमध्ये आपण मराठा असल्याचा प्रचारही त्यांनी केला होता. पण ते पराभूत झाले. शिवसेनेच्या शिंदे गटात असताना सिल्लोडचे आमदार व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भोवताली वावरणाऱ्या नितीन पाटील यांना कन्नडमधून निवडून आणू असा दावा सत्तार करत होते. त्यांचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील प्रवेश महायुतीमधील जागावाटपाची बोलणी पुढे गेल्याचे संकेत मानले जात आहेत.