वैजापूरचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यशैलीवर टीका करत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर १५० हून अधिक गावात संपर्क करुन काेणत्या पक्षात जावे याची चापपणी केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करावे असे कार्यकर्त्यांनी सांगितल्याने शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे त्यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.

हेही वाचा >>>गंगापूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून नवी पटमांडणी; आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून पेरणी

Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
ajit pawar shivajirao adhalrao patil
शिवाजीराव आढळराव पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश, शिरूर लोकसभेचं तिकीट पक्कं?
lok sabha 2024, Shiv Sena , Shirur, former MP Shivajirao adhalrao Patil, Join NCP ajit pawar group, NCP Candidate, eknath shinde, maharashtra politics, marathi news,
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची खेळी! उद्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये प्रवेश

जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाऊसाहेब ठोंबरे, पंकज ठोंबरे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यात आला होता. पक्षाचा हा विस्तार मान्य नसल्याचे सांगत पक्षातून मला मुक्त करा असे भाऊसाहेब चिकटगावकर म्हणाले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर कोणताही वाद नाही किंवा राष्ट्रवादी पक्षाशी कोणतीही प्रतारणा न करता तो पक्ष सोडला असून आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वैजापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात गेल्यानंतर वैजापूर मतदारसंघातील राजकीय पटमांडणीत बदल होतील असे मानले जात होते. या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आर. एम. वाणी यांचा प्रभाव होता. त्यांनी रमेश बोरनारे यांनी उमेदवार व्हावे असे सूचविले होते. नव्याने राजकीय पटमांडणी काही का होईना आता आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे चिकटगावकर म्हणाले. गेल्या काही दिवसापासून चिकटगावकर राष्ट्रवादीत नाराज असल्याचे वृत्त होते. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे ते नातेवाईक असल्याने ते भाजपमध्ये प्रवेश घेतील, अशी चर्चाही गेल्या दीड वर्षापासून सुरू होती. आता ते शिवसेनेत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊसाहेब चिकटगावकर यांचे पुतणे अभयसिंह चिकटगावकर यांनी वैजापूर विधानसभा निवडणूक लढविली होती. या मतदारसंघातून भाजपकडून दिनेश परदेशी हेही मतदारसंघ बांधत आहेत. चिकटगावकरांच्या निर्णयामुळे वैजापूर मतदारसंघातील राजकीय पटमांडणी आता स्पष्ट होऊ लागली आहे.