scorecardresearch

Premium

‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य धोक्यात ? काँग्रेस आणि आपमधील दरी रुंदावली

आमदारच्या अटकेबद्दल काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत ‘आप’ला आघाडी धर्माची आठवण करून दिली आहे.

india alliance future in danger, congress mla sukhpal singh khaira arrested, punjab congress mla arrested by aap
'इंडिया' आघाडीचे भवितव्य धोक्यात ? काँग्रेस आणि आपमधील दरी रुंदावली (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पंजाबमधील काँग्रेस आमदाराच्या अटकेनंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमधील दरी अधिकच रुंदावली आहे. आमदारच्या अटकेबद्दल काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत ‘आप’ला आघाडी धर्माची आठवण करून दिली आहे. पंजाबमधील काँग्रेस आमदार सुखपालसिंग खैरा यांना २०१५ मधील अंमली पदार्थाशी संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने अभय दिले असताना पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारने राजकीय सूडबुद्धीने अटक केल्याचा आरोप आमदार खैरा यांनी केला आहे. आमदार खैरा हे पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारचे टीकाकार मानले जातात.

अलीकडेच आपचे खासदार राघव छड्डा यांचा विवाह समारंभ पार पडला. या शाही विवाहाबद्दल खैरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत आपबरोबर आघाडी करण्यास त्यांचा ठाम विरोध आहे. आमदाराच्या अटकेबद्दल काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांनीही नाराजी व्यक्त केली. ‘कोणी आमच्यावर अन्याय करीत असल्यास आम्ही ते सहन करणार नाही’, असा इशारा खरगे यांनी आम आदमी पार्टी सरकारला दिला आहे. पंजाब आणि दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचा आपबरोबर आघाडी करण्यास ठाम विरोध आहे. मात्र, इंडिया आघाडीचे घटक पक्ष म्हणून दोन्ही राज्यांमध्ये जुळवून घेण्याची सूचना काँग्रेस नेतृत्वाने केली आहे.

saleem sherwani on akhilesh
अखिलेश यादव मुस्लीम शब्द का उच्चारत नाहीत? असा सवाल करत सपा नेत्याचा राजीनामा 
Prashant Jagtap threatened
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी
Sonia Gandhi filed candidature
सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवणार, पण इंडिया आघाडीचे भवितव्य काय?
Leaders farewell to Congress
काँग्रेसला गळती आणि नेत्यांची भाजप व मित्रपक्षांकडे रीघ

पंजाबमधील काँग्रेस आमदाराच्या अटकेनंतर पंजाबबरोबरच दिल्लीमधील काँग्रेस नेत्यांना संधीच मिळाली आहे. आपशी हातमिळवणी नकोच, अशी त्यांची भूमिका आहे. आमदाराच्या अटकेनंतर खरगे यांनीच आघाडी धर्माबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने काँग्रेस आणि आपमध्ये कितपत जुळेल याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी आणि डावे पक्ष स्वतंत्रपणे उभयतांच्या विरोधात लढणार आहेत. केरळमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेस स्वतंत्र लढणार आहेत. काँग्रेस आणि आपमधील ताणले गेलेले संबंध लक्षात घेता पंजाब आणि दिल्लीतही आघाडीबाबत साशंकताच व्यक्त केली जाते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Future of india alliance in danger after arrest of congress mla sukhpal singh khaira in punjab by aam aadmi party print politics news css

First published on: 29-09-2023 at 10:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×