मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन जेवढ्या कामांच्या फिती कापायच्या असतील तेवढ्या कापून घ्याव्यात. त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला आणि तुमच्या गद्दार मित्रांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. दीड महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले सर्व गद्दार बेरोजगार होणार आहेत. त्यानंतर ते आपल्याकडे रोजगार मागायला येतील, पण एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या रोजगार मेळाव्यात शिंदे गटाला लक्ष्य केले.

हेही वाचा >>> शिंदे गटातील युवा सेना पदाधिकाऱ्यासह अनेक नगरसेवकांचा रविवारी ठाकरे गटात प्रवेश?

Rajendra Deshmukh karjat
आमदार राम शिंदे व भाजपाला रोहित पवार यांनी दिला मोठा धक्का! भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
Eknath Shinde : “मुख्यमंत्री करा म्हणत ते दारोदारी भटकत आहेत, त्यांचा चेहरा मित्रपक्षांनाही..”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
sadanand tharwal left uddhav shiv sena in dombivli
ठाकरे गटाचे डोंबिवलीतील सदानंद थरवळ यांचा शिवसेनेला रामराम
Kedar Dighe and Eknath Shinde
Kopari Pachpakhadi : कोपरी-पाचपाखाडीत शिष्य विरुद्ध वारसदार युद्ध; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे रिंगणात!
laxman dhoble leaving bjp joining sharad pawar ncp
आपटीबार : दुबळे कारण
Eknath shinde
शिंदे-फडणवीस यांची राज ठाकरेंबरोबर खलबते
Farooq Abdullah
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर फारुख अब्दुल्ला आक्रमक, पाकिस्तानला इशारा देत म्हणाले…

आमदार अॅड. अनिल परब यांनी आयोजित केलेल्या ह्यमहानोकरीह्ण मेळाव्याचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते शनिवारी पार पडले. या कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात १५ तरुणांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीची पत्रे प्रदान करण्यात आली. त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटाला लक्ष्य केले. गद्दारी केल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आपल्या राज्यात कोणीही गुंतवणूकदार यायला तयार नाहीत, असे ठाकरे म्हणाले.

मराठी माणूस तो फलक तोडेल

मराठी माणसांना रोजगार नाकारणाऱ्या कंपन्यांचा या वेळी ठाकरे यांनी समाचार घेतला. मधल्या काळात मराठी माणसाला नोकरीमध्ये ‘नो एण्ट्री’च्या जाहिराती आल्या होत्या, पण असे बोर्ड ज्या दारावर लागतील ते दार तोडून टाकून मराठी माणूस आतमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देताना प्रत्येक राज्यामध्ये भूमिपुत्रांचा मान राखला गेलाच पाहिजे, असे ठाकरे यांनी ठणकावले.