दीपक महाले

जळगाव : समाजातील उपेक्षितांसाठी सेवाभावी वृत्तीने काही जण करीत असतात. जळगावमधील गजानन मालपुरे हे त्यापैकीच एक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक म्हणून सध्या ते जबाबदारी सांभाळत आहेत. पाचोरा तालुक्यातील लोहटार हे मालपुरे यांचे मूळ गाव आहे. वाणिज्य शाखेत पदवीधर असलेले मालपुरे यांचा व्यवसाय शेती आहे. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अनेक वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहेत.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

हेही वाचा… डॉ. देवेंद्र वानखडे : लोकपाल आंदोलनातून राजकारणात

सामान्यांना न्याय देणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. शहरातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी केलेले आंदोलन चांगलेच गाजले होते. बाजार समितीच्या नियोजित संकुलातील गाळ्यांचा लिलाव केल्यास बाजार समितीला अधिक लाभ होणार असल्याचे मालपुरे यांनी सुचविले होते. त्यांच्या या सूचनेचा विचार करण्यात आला होता. २०१० मध्ये शहरातील आर. आर. विद्यालयातील पोषण आहारासाठी असलेला १८४ क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात जात असताना मालपुरे यांनी पकडून दिला होता. २०१२-१३ मध्ये खासगी शाळांत विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तके घेण्याची सक्ती करण्यात आल्याने पालकवर्ग वैतागला होता. मालपुरे यांनी आंदोलन केले.

हेही वाचा… अभिमन्यू पवार : आमदार, औसा विधानसभा मतदारसंघ ,स्वयंसेवक ते आमदार

करोनामुळे टाळेबंदीत मालपुरे यांनी सिद्धिविनायक मंदिर संस्थानमार्फत रोज अन्नाच्या तीन हजार अधिक पाकिटांचे गरजू, गोरगरिबांना वाटप केले होते. महापालिकेत २०२१ मध्ये शिवसेनेची सत्ता आणण्यात मालपुरे यांचा सिंहाचा वाटा होता. एखाद्या व्यक्तीला रक्तदान असो किंवा वेळप्रसंगी आर्थिक मदत असो, शिधापत्रिका, विविध प्रकारचे दाखले आदी कामे असो; हाक दिल्यानंतर मालपुरे हमखास पुढे येतात. शिवसेना शहरप्रमुख ते जिल्हा संघटक या राजकीय प्रवासात त्यांनी अनेकांना सहकार्य केले.