छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शक्तिप्रदर्शन केले. या वेळी सर्वसामांन्याच्या सर्व योजना सुरू राहतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. परांडा येथे महिला व बालविकास विभागाच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महिला सशक्तीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण बंद केले पाहिजे, असे वक्तव्य केले. तसेच देशाचीही बदनामी केली. त्यामुळे त्यांना जनतेने हद्दपार केले पाहिजे. कर्नाटक राज्यातही गणेशोत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात येत आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात अशा शोकांतिका घडत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात ५२ टक्के गुंतवणूक झाल्याने भविष्यकाळात हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजना अशी देशातील कोणत्याही राज्यात योजना नाही. केवळ महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी ही योजना असून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी आहे. उच्च शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत, मुलींच्या व पालकांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी राज्याने मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\

nana patole, Vijay wadettiwar
महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी; पटोले, धानोरकर, वडेट्टीवारांना पक्षश्रेष्ठींकडून पाचारण
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Navi Mumbai Semiconductor project
‘सचिन तेंडुलकर ‘पिच’वरून ‘चीप’वर आले’, एकनाथ शिंदेंची टोलेबाजी
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : ‘एक तर तू राहशील किंवा मी राहिन’, उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, “त्यांना वाटत असेल तर..”

हेही वाचा : PM Modi Election Rallies: हरियाणात विजय मिळवणं भाजपासाठी महत्त्वाचं का? ही आहेत तीन कारणे…

शिवराय, आंबेडकरांचा पुतळा उभारणार

परांडा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी परवानगी मिळत नाही, अशी खंत पालकमंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परांडा शहरात आजवरच्या तत्कालीन लोकप्रतिनिधींनी उभारला नाही, ही खेदजनक बाब आहे, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाईल. त्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्य सरकारकडून मिळेल, असे जाहीर केले.