अकोला : भाजपचे ज्येष्ठ नेते स्व.पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांची कर्मभूमी असलेल्या अकोला जिल्ह्याचे पालकत्व त्याचे पूत्र ॲड.आकाश फुंडकर यांच्याकडे आले आहे. अकोल्याला सलग चौथ्यांदा जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री लाभले. लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये समन्वय राखून जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान पालकमंत्र्यांपुढे राहील. आकाश फुंडकर यांच्याकडून अकोलेकरांच्या मोठ्या अपेक्षा राहणार आहेत.

अकोला जिल्ह्याची मंत्रिपदावरून कायम उपेक्षा होते. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात अकोला जिल्ह्यातील डॉ. रणजीत पाटील यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागली होती. त्यानंतर २०१९ पासून जिल्ह्याला मंत्रिपदाची प्रतीक्षा कायम आहे. मंत्रिपदासाठी अकोला पूर्वचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांचे नाव चांगलेच चर्चेत होते. मंत्रिपदाऐवजी भाजप पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी (कॅबिनेट दर्जा) त्यांची वर्णी लागली. गेल्या सहा वर्षांत जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री नियुक्त झाले. मविआ सरकारमध्ये बच्चू कडू, तर महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद होते. आता पश्चिम वऱ्हाडात एकमेव मंत्रिपद खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना मिळाले. अपेक्षेप्रमाणे अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पद आकाश फुंडकरांकडे आले.

congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
youths Ambernath questions republic day hoardings future corporators
प्रजासत्ताकदिनी तरूणांनी वेधले लक्ष ; प्रजासत्ताक दिनाचे बॅनर का नाहीत, भावी नगरसेवकांना सवाल
intra party discord seen during protest against ec organized by pune congress
काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते वेठीला? शहरातील पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

हेही वाचा >>>नव्या पालकमंत्र्यास समतुल्य सहकारी सांभाळण्याचेच आव्हान

पुनर्रचना होण्यापूर्वी खामगाव विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघाचा भाग होता. भाऊसाहेब फुंडकर १९८९ मध्ये सर्वप्रथम अकोल्यातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९१ व १९९६ लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवत त्यांनी हॅट्ट्रिक साधली. १९९८ व १९९९ च्या निवडणुकीत भाऊसाहेब फुंडकरांना थेट लढतीत पराभवाचा धक्का बसला. अकोल्यात भाजपच्या संघटनात्मक बांधणीत भाऊसाहेब फुंडकरांचे तळागाळून कार्य असून कुणबी समाजाचे नेते म्हणून त्यांना मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे नेतृत्व पुढे आल्यानंतर गेल्या अडीच दशकात भाऊसाहेब फुंडकरांचा जिल्ह्यातील प्रभाव कमी होत गेला. आता त्यांचे पूत्र आकाश फुंडकर यांच्यावर अकोला जिल्ह्याच्या पालकत्वाची मोठी जबाबदारी आली. वडिलांच्या कर्मभूमीत छाप सोडण्याची उत्तम संधी आकाश फुंडकरांना मिळाली आहे. जिल्ह्यात शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी निधी, अपूर्ण सिंचन प्रकल्प, रस्ते, शेतकऱ्यांचे प्रश्न, औद्योगिक विकास, विकासात्मक कामे मार्गी लावण्याची अपेक्षा आकाश फुंडकरांकडून राहील. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये ताळमेळ राखण्याची कसरत देखील त्यांना करावी लागेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पालकमंत्री म्हणून पक्षांतर्गत समन्वय राखण्याचे आव्हान सुद्धा फुंडकरांपुढे राहणार आहे.

बुलढाण्याऐवजी अकोल्याची जबाबदारी

राज्यात बहुतांश ठिकाणी संबंधित जिल्ह्याच्या मंत्र्यांवरच पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आकाश फुंडकरांना मात्र स्वजिल्ह्याऐवजी अकोल्याचे पालकमंत्री पद देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातून आ.आकाश फुंडकरांसह आ.संजय कुटे, आ.चैनसुख संचेती, आ.श्वेता महाले हे मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मंत्रिपदाची संधी फुंडकरांना मिळाल्यामुळे इतरांचे समर्थक नाराज झाले. पक्षांतर्गत गटबाजी आणखी वाढू नये म्हणून बुलढाण्यात जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Story img Loader