गुजारात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकाही पार पडल्या आहेत. दरम्यान, गुजरात राज्यात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दिल्ली महापालिकेत लोकांनी आपला पसंदी दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे तसा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मतदानोत्तर चाचण्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>> Gujarat Election Exit Polls : भाजपा, काँग्रेस की आप? गुजरातमध्ये कोण बाजी मारणार, कोणाला किती जागा? वाचा एक्झिट पोल…

narendra modi
“जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार, राज्याला लवकरच…”, पंतप्रधान मोदींच्या तीन मोठ्या घोषणा
loksatta editorial Supreme court descion regarding candidate affidavit on asstets
अग्रलेख: अपवादांचा अपराध!
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
ram arun govil in loksabha bjp
‘प्रभू रामचंद्रां’चे निवडणुकीच्या रणधुमाळीत आगमन; भाजपाचा काय विचार?

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

“एक्झिट पोलनुसार जनतेने पुन्हा एकदा आम आदमी पार्टीवर विश्वास ठेवल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलनुसारच निकाल येतील अशी अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीवर बोलताना “आम आदमी पार्टी हा नवा पक्ष आहे. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला आहे, असे म्हटले जाते. मात्र आम्हाला या राज्यात १५ ते २० टक्के मतं मिळत आहेत. ही छोटी बाब नाही. मतमोजणी होईपर्यंत आपण वाट पाहायला हवी,” असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

हेही वाचा >>> MCD exit poll: ‘आप’ली दिल्ली! महापालिका निवडणुकीत ‘आप’चा वरचष्मा; भाजपाला धक्का, काँग्रेस नगण्य

दिल्ली पालिका, गुजरातमध्ये कोणाला किती जागा ?

गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथे एकूण १८२ जागांपैकी १२९ ते १५१ जागांवर भाजपाचा विजय होण्याची शक्यता आहे. तर दिल्ली महापालिकेत आप पक्षाचे १४९ ते १७१ नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. भाजपाचा विजय ६९ ते ९१ जागांवर विजय होऊ शकतो.