केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या सर्वांना माहीत आहेत. मात्र, भारतीय जनता पार्टीत अमित पोपटलाल शाह असे एक उमेदवारदेखील आहेत. ते भाजपाचे कट्टर समर्थक असून ते सलग पाचवेळा महापौर म्हणून निवडून आले आहेत. यानंतर आता भाजपाने त्यांना एलिसब्रिज विधानसभेच्या जागेवरून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळताच भाजपाचे दुसरे अमित शाह अॅक्शमोडमध्ये आले असून त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

अहमदाबादचे माजी महापौर अमित पोपटलाल शाह (वय-६३) विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर आपला मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यासाठी ते पायी फिरत आहेत. पण त्यांच्या वेगवान चालण्यामुळे भाजपाच्या बहुतेक कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. त्यांचा चालण्याचा वेग चर्चेचा विषय ठरत आहे.

Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Sanjay Raut Manoj Jarange
महाविकास आघाडी मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले…
annie raja
“केरळमधून निवडणूक लढवून राहुल किंवा काँग्रेसला काय फायदा?” सीपीआय वायनाडच्या उमेदवार म्हणाल्या, “मला वाटते…”
Rahul Gandhi will again contest the Lok Sabha elections from Amethi
राहुल गांधी पुन्हा अमेठीतून लढणार?

अहमदाबादचे भाजपाचे विद्यमान महापौर अमित शाह यांनी एलिसब्रिज मतदारसंघात आपला प्रचार तीव्र केला आहे. अहमदाबादमधील १६ विधानसभा जागांपैकी एकाही जागेवर आम आदमी पार्टीचा उमेदवार निवडून येणार नाही, असा विश्वास अमित पोपटलाल शाह यांनी व्यक्त केला आहे. तसेच ते स्वत: ८० हजारांहून अधिक मतांनी विजयी होतील, अशी त्यांना खात्री आहे.

दररोज १८ हजार पावलं चालतो- शाह

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना शाह म्हणाले की, निवडणुकीपूर्वी जनतेसमोर जाणे आवश्यक आहे. त्यासाठी मी दररोज १८ हजार पावलं चालत आहे. निवडणुकीनंतरही मी जनतेशी कायम संपर्क ठेवणार आहे. मी मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना भेटत आहे, असंही त्यांनी सांगितले.

अमित पोपटलाल शाह यांनी उमेदवारी अर्जात ३ कोटी १५ लाखांची एकूण संपत्ती घोषित केली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल आहे. नर्मदा बचाव आंदोलनादरम्यान अमित शाह यांनी आंदोलनकर्त्या मेधा पाटकर यांच्यावर हल्ला केला होता. याबाबतचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. हा खटला आजही अहमदाबाद मॅजिस्ट्रेट कोर्टात सुरू आहे.