गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला केवळ तीन दिवस बाकी आहेत. गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, यंदा आम आदमी पक्ष पहिल्यांदाच गुजरातमध्ये निवडणूक लढवत असून नुक्कड सभा, प्रोजेक्टर यासह विविध मार्गाने ‘आप’कडून प्रचार सुरू आहे. तसेच प्रचार करण्यासाठी दिल्ली आणि पंजाबमधूनही कार्यकर्ते गुजरातमध्ये दाखल झाले असल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Gujarat Election: सुरतमधील दोन जागांवर तब्बल ३७ अपक्ष मुस्लीम उमेदवार, ऑटो चालक ते डिलिव्हरी बॉय आजमावतायत नशीब

नुक्कड सभेच्या माध्यमातून आपचा प्रचार

पहिल्या टप्प्याच्या मतदानाला केवळ तीन दिवस बाकी असताना आप कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन प्रचार करण्यात येत आहे. तसेच नुक्कड सभा आणि चौकाचौकात मोठे प्रोजेक्टर लावूनही प्रचार सुरू आहे. दरम्यान, आमचा पक्ष गरीब असून आमच्याकडे संसाधनांची कमी आहे. त्यामुळे नुक्कड सभा आणि प्रोजेक्टरच्या माध्यमांतून आम्ही प्रचार करत असल्याची प्रतिक्रिया पंजाबमधील आप आमदार गुरपीत गोगी यांनी दिली आहे.

हेही वाचा – Gujarat Election 2022: “गुजरातमध्ये सत्तेत आल्यास…” अरविंद केजरीवाल यांचं मोठं आश्वासन, म्हणाले, “सरकारी कर्मचारी आणि…”

‘आप’कडून विविध आश्वासनं

गुजरातमध्ये आपकडून बेरोजगार युवकांना प्रतिमहिना तीन हजार रुपये बेरोजगार भत्ता, तसेच १८ वर्षावरील सर्व महिलांना प्रतिमहिना एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन ‘आप’कडून देण्यात आले आहे. याचबरोबर गुजरातमधील नागरिकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासनही ‘आप’कडून देण्यात येत आहे. दिल्लीप्रमाणेच गुजरातमध्येही शाळा, मोहल्ला क्लिनिक आदी उभारण्याचे आश्वासन ‘आप’कडून देण्यात आले आहे. ”आम्ही गुजरातमधील युवकांना ‘केजरीवाल रोजगार कार्ड’ वाटप करत असून त्याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया मेहसाणाचे ‘आप’चे उमेदवार भगतभाई पटेल यांनी दिली आहे. गुजरातमध्ये ‘आप’चा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आमची लढत ही काँग्रेसशी नसून २७ वर्ष सत्तेत असणाऱ्या भाजपाशी असल्याचे प्रतिक्रिया ‘आप’ नेत्यांकडून देण्यात येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat election 2022 aap election campaign through nukkad sabha with projectors spb
First published on: 28-11-2022 at 21:18 IST