scorecardresearch

Gujarat Election 2022 : …म्हणून गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील एका गावातील मुस्लिमांनी मतदानावर टाकला बहिष्कार

जाणून घ्या काय आहे नेमके कारण; गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झाले आहे.

Gujarat Election 2022 : …म्हणून गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील एका गावातील मुस्लिमांनी मतदानावर टाकला बहिष्कार
(प्रातिनिधिक छायाचित्र)

Gujarat Election News: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान झाले. त्यातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज होते. मात्र या मतदानादरम्यान एक प्रकार समोर आला. येथील खेडा जिल्ह्यातील एका गावातील मुस्लिमांनी मतदानावर बहिष्कार टाकला. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

खेडा जिल्ह्यातील उंधेला गावात नवरात्र उत्सव काळात पोलिसांनी काही तरुणांना सार्वजनिक ठिकाणी केलेल्या मारहाणीमुळे लोक संतपालेले होते. त्यामुळे त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात नवरात्र उत्सव काळात उंधेला गावातील युवकांना मारहाण झाल्याची व्हिडीओ समोर आला होता. आरोपानुसार गरबा कार्यक्रमात काही मुस्लिम तरुणांनी कथितरित्या दगड फेक केली होती. ज्यानंतर पोलिसांनी त्यांना एका खांबाला बांधून काठीने बेदम मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या मारहाणीशिवाय काही मुस्लीम तरुणांना पोलिसांनी अटकही केली होती.
या घटनेबाबत पोलीस उपाधीक्षक वीआर वाजपेयी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले होते की, एफआयआर नोंद झाल्यानंतर १३ जणांना ताब्यात घेतले होते. याशिवाय या घटनेनंतर गावात मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास जवळपास १५० जणांच्या समुहाने ३ ऑक्टोबर रोजी एका मंदिर परिसरात सुरू असलेल्या गरबा कार्यक्रमावर दगडफेक केली होती.

मारहाणीच्या व्हिडीओमध्ये काही पोलीस या तरुणांना बेदम मारताना दिसत होते, तर सभोवताली जमलेली गर्दी त्यांना प्रोत्साहन देताना दिसत होते. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या घटनेच्या सखोल तपासासाठी एक चौकशी नेमण्यात आली होती. या घटेनमुळे स्थानिक लोकांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला आणि त्यामुळेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 22:55 IST

संबंधित बातम्या