Gujarat Election Results 2022 : गुजरात विधानसभेचे निकाल हळूहळू हाती येत आहेत. पहिल्या काही तासांच्या मतमोजणीनंतर भाजपा पुन्हा एकदा गुजरातमध्ये विक्रमी जागा जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या मतमोजणी सुरू असून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काँग्रेसचे संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व आणि पक्षाच्या संघटमात्मक रणनितीमुळेच भाजपाला हे यश मिळाले आहे. काही वर्षांपूर्वी ९९ जागांवर मर्यादीत असलेला भारतीय जनता पक्षाने आज १५० पेक्षा जास्त जागांवर मुसंडी मारली आहे. यंदा भाजपा स्वत:च्या १२७ जागांचा आणि १९८५ मध्ये काँग्रेसने मिळवलेल्या १४९ जागांचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. १९८५ मध्ये इंदिरा गांधीच्या हत्येनंतर काँग्रेसला सहानुभूमी मिळाली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने विक्रम जागा जिंकत विजय नोंदवला होता.

BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
2024 Lok Sabha elections
उत्तराखंडमध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचे लक्ष्य
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला
lok sabha election 2024, nanded, constituency, vanchit bahujan aghadi, congress, bjp
नांदेडमध्ये वंचितच्या उमेदवाराचा यंदा कोणाला फटका ?

हेही वाचा – Gujarat Election Results 2022 Live: हा निकाल धक्कादायक आहे, गुजरातच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं विधान; वाचा प्रत्येक अपडेट

गुजरात विधानसभेसाठी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत कांग्रेसने सत्ताधारी भाजपाविरोधात आक्रमक प्रचार करत गुजरातमधील पाटीदार समाज आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने म्हणावा, तसा प्रचार केला नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केवळ दोनच जाहीर सभा घेतल्या.

यंदा आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच गुजरातमध्ये निवडणूक लढवली. तसेच गुजरातमध्ये मतदानापूर्वी झालेल्या सर्वक्षणातून आप भाजपापेक्षा वरचढ असल्याचे लक्षता येताच भाजपाने आपली रणनिती संपूर्णपणे बदलली. भाजपाकडून मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसह संघटनात्मक पातळीवरही बदल करण्यात आले. भाजपाने विजय रुपाणींच्या जागी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केले. तसेच २०२२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थ्येच्या निवडणुकांपूर्वी जीतू वाघाणींच्या जागी सी.आर पाटील यांची प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी दिली. या बरोबरच इतर संघटनात्मक बदलही भाजपाकडून करण्यात आले. पक्षाच्या सरचिटणीपदी भिकूभाई दलसानीया यांच्या जागी रत्नाकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर दलसानीया यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले. उमेदवारांच्या नियुक्तीबाबतही भाजपाने कठोर पावले उचलली. भाजपाकडून ४१ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्यात आले आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

हेही वाचा – Himachal Pradesh Election Results 2022 Live : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची मुसंडी, भाजपा पिछाडीवर, जाणून घ्या निकाल

पंतप्रधान मोदींनीही गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात सभा घेत भाजपाचा विजय सुनिश्चित केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी गुजरातमध्ये दाखल झाले होते. ते गुजरातमध्ये बूथ-स्थरावरील कार्यकर्तांशी थेट संपर्कात होते. त्यांनी जवळपास दररोज दोन बूथ-स्थरीय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.जातीय समीकरणांच्या दृष्टीने भाजपाने विशेष रणनिती आखली होती. भाजपाने आपल्या सर्व मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना गुजरातच्या विविध भागांची जबाबदारी दिली होती. तसेच भाजपाचे इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि नेत्यांसुद्धा गुजरातमध्ये येऊन प्रचार केला. दरम्यान, सध्याच्या निकालानुसार भाजपा आखलेली रणनिती यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.