मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांकडून भाजपाचा प्रचार, काँग्रेस ECकडे करणार तक्रार | Gujarat election voting pm narendra modi and amit shah road show congress likely to file complaint at ec rmm 97 | Loksatta

मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांकडून भाजपाचा प्रचार, काँग्रेस ECकडे करणार तक्रार

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं.

मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांकडून भाजपाचा प्रचार, काँग्रेस ECकडे करणार तक्रार
(Express photo by Nirmal Harindran)

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या मतदानानंतर गुजरात काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना भारतीय जनता पार्टी प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मतदान केल्यानंतर गुजरातच्या एका खासदारासोबत चालत ‘रोड शो’ केला. यावेळी त्यांनी भाजपाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

हेही वाचा- शशी थरूर यांना थेट राष्ट्रवादीकडून ऑफर, म्हणाले “पक्षात येण्याची… “

दुसरीकडे, मतदानाच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अडीच तासांचा ‘रोड शो’ केला. या प्रकाराविरोधात आपण निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत. निवडणूक आयोगही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे,” असा आरोप काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अहमदाबादमध्ये वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान केलं.

हेही वाचा- Gujarat Election 2022 : गुजरातच्या जुहापुरातील मुस्लीम समुदाय अद्यापही शिक्षणापासून वंचित

“दंता (कांती खराडी) येथील आमचे आदिवासी नेते आणि आमदार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून संरक्षण मागितलं होतं. परंतु निवडणूक आयोगाने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर भाजपाच्या २४ गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. गुजरातमध्ये दारूबंदी असतानाही भाजपाकडून गुजमध्ये दारूचे वाटप करण्यात आलं. यावरही कोणतीही कारवाई केली नाही,” असा आरोपही पवन खेरांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 21:11 IST
Next Story
समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा: उपमुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या वादानंतर झटपट नूतनीकरण