दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता गुजरात सरकारने आगळावेगळा निर्णय घेतला आहे. येते २७ ऑक्टोबरपर्यंत ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघ केल्यास दंड आकारला जाणार नसल्याची घोषणा गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी केली आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे गुजरात सरकारने सणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असला तरी सणासुदीच्या काळातच अपघात, अपघातामुळे मृत्यूंची संख्या वाढलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>> उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावती पुन्हा ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये; संघ, भाजपाला केलं लक्ष्य, म्हणाल्या…

गुजरात सरकारने २७ ऑक्टोबरपर्यंत ट्रॅफिकचे नियम तोडल्यास दंड न आकारण्याची घोषणा केल्यानंतर येथी पोलिसांनी नियम तोडणाऱ्यांच्या हाती गुलाबाचे फूल देत नियमांचे महत्त्व सांगण्याची मोहीम हाती घेतली आहे. अहमदाबाद वाहतूक शाखेचे पोलीस अध्यक्ष साफीन हसन यांनी दिवाळीच्या काळातच चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे अशा प्रकारच्या गन्ह्यांत वाढ होते, असे सांगितले आहे.

हेही वाचा >>>> गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीत रोजगाराचा मुद्दा केंद्रस्थानी; ‘आप’ १० लाख नोकऱ्या देणार, भाजपाच्या जाहिरनाम्यात काय?

“मंत्रीमहोदयांनी केलेल्या घोषणेनुसार वाहतुकीचे किरकोळ नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोणाकडूनही दंड आकाणार नाही किंवा त्यांच्यावर कारवाई करणार नाही. यामध्ये हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, बेकायदेशीर पार्किंद, जास्त वेगाने वाहन चालवणे, अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. मात्र गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत,” असे साफीन हसन यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>>> गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीत रोजगाराचा मुद्दा केंद्रस्थानी; ‘आप’ १० लाख नोकऱ्या देणार, भाजपाच्या जाहिरनाम्यात काय?

आकडेवारी काय सांगते?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) दिलेल्या माहितीनुसार २०२१ साली देशातील एकूण अपघातांपैकी ४ टक्के अपघात हे गुजरातमध्ये झालेले आहेत. तर येथे अपघातामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सरासरी ७४५७ आहे. देशाच्या तुलनेत (४३२२) ही संख्या जवळपास दुप्पट आहे. गुजरातमध्ये साधारण ८२ टक्के अपघात हे वाहन जास्त वेगाने चालवल्यामुळे झालेले आहेत. २०२१ साली अशा प्रकारच्या १२५७४ घटना घडलेल्या आहेत. गुजरातमध्ये २०२१ साली जानेवारी महिन्यात १४५९, मार्च महिन्यात १४४६ तर डिसेंबर महिन्यात १४१० अपघातांची नोंद करण्यात आलेली आहे. सणांची रेलचेल अससलेल्या महिन्यांत म्हणजेच ऑक्टोबरमध्ये १३४३ आणि नोव्हेंबर महिन्यात १३७९ अपघातांची नोंद झालेली आहे.

हेही वाचा >>>> केरळमधील CPM नेत्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, सोने तस्करी प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश पुन्हा चर्चेत!

गुजरातमध्ये २०२१ साली एकूण १५२०० अपघातांची नोंद झालेली आहे. तर एकूण १३७२२ जण जखमी झालेले आहेत. तर या वर्षी अपघातामुळे एकूण ७४५७ जणांचा मृत्यू झालेला आहे. वरील आकडेवारी पाहता गुजरातच्या राज्यमंत्र्यांनी सणांच्या पार्श्वभूमीवर ट्रॅफिकचे नियम तोडल्यावर कारवाई न करण्याचा निर्णय किती योग्य आहे, असा सवाल केला जातोय.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat minister announces no fine for breaking traffic rules but what numbers say prd
First published on: 24-10-2022 at 17:59 IST