गुलाम नबी आजाद यांनी जम्मू आणि काश्मीरच्या प्रचार समितीचे अध्यक्ष पद नाकारले

आजाद त्यांच्या जवळच्या नेत्याने सांगितले की पक्षाने दिलेल्या पदांमुळे गुलाम नबी आजाद यांच्या मनात अपमानित केल्याच्या भावना आहेत.

गुलाम नबी आजाद यांनी जम्मू आणि काश्मीरच्या प्रचार समितीचे अध्यक्ष पद नाकारले
गुलाम नबी आजाद

काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष आणि पक्षाच्या जम्मू आणि काश्मीर युनिटमधील प्रचार समितीचे सदस्य म्हणून गुलाम नबी आजाद यांची नियुक्ती करण्यात आली.  नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या काही तासांनंतरच गुलाम नबी आजाद यांनी दोन्ही पदे स्वीकारण्यास नकार दिला. आजाद यांच्या या निर्णयामुळे पक्ष तोंडघाशी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

आजाद त्यांच्या जवळच्या नेत्याने सांगितले की पक्षाने दिलेल्या पदांमुळे गुलाम नबी आजाद यांच्या मनात अपमानित केल्याच्या भावना आहेत. ते  सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील प्राचार समितीचे सदस्य आहेत. असं असताना  एखाद्या राज्यातील अशाच समितीमध्ये त्यांचा सदस्य म्हणून समावेश करणे विचित्र आहे”. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने विकास रसूल वानी यांना जम्मू आणि काश्मीर युनिटचे अध्यक्ष म्हणून आणि रमण भल्ला यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. यानंतर जम्मू आणि काश्मीर युनिटचे माजी प्रमुख जी ए मीर यांनी उघड बंड करत राजीनामा दिला.  या राजीनाम्याच्या काही दिवसानंतरच या नाविन नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. 

एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याच्या मते, आजाद यांची केंद्रशासित प्रदेशांच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करणे देखील अपमानास्पद होते. पाच सरकारांमध्ये आणि चार पंतप्रधानांसोबत ते मंत्री होते. ते सात वर्षे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. ते गेली ३७ वर्षे काँग्रेस  पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीत आहेत. काही राज्यात पक्षाचे प्रभारी आहेत.आणि आता इतक्या मोठ्या नेत्याला केंद्रशासित प्रदेशांच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त करत आहेत”.  काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी मंगळवारी नवीन केंद्रशासित प्रदेश अधिकाऱ्यांची यादी जारी केली. पक्षाचे वरिष्ठ नेते तारिक हमीद कारा काश्मीर खोऱ्यातील एक जेष्ठ नेते आहेत. त्यांना प्रचार समितीचे उपाध्यक्ष आणि आजादचे अत्यंत निष्ठावंत सहकारी असलेले जी.एम सरूरी यांना संयोजक बनवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, माजी मंत्री, बनिहाल आणि गांधी नगर विधानसभा मतदारसंघातील दोन वेळा आमदार असलेले विकार रसूल आणि रमण भल्ला हे अनुक्रमे जम्मू प्रदेशातून आलेले आहेत. जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष दोघेही आहेत. या निर्णयामुळे अंतर्गत भांडण वाढेल आणि जम्मू आणि खोऱ्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये फूट पडेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gulam nabi azad refused to take charge of parties jammu and kashmirs political affair chief post pkd

Next Story
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगली दौऱ्यात स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांचा पुढाकार आणि भाजपकडून मात्र थंडे स्वागत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी