भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंना आता भाजपामधूनही पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. जंतरमंतर येथे आंदोलन करत असताना भाजपा वगळता अनेक पक्षांचे नेते खेळाडूंना भेटण्यासाठी येत होते. मात्र २८ मे रोजी खेळाडूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मंगळवारी आपली पदके गंगेत वाहण्यासाठी सर्व खेळाडू हरिद्वार येथे पोहोचले. मात्र काही शेतकरी नेत्यांनी मध्यस्थी करत खेळाडूंची मनधरणी केली आणि त्यानंतर पदके विसर्जित करण्याचा निर्णय काही काळासाठी मागे घेण्यात आला. हरयाणामधील भाजपाचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनीही आता खेळाडूंच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली आहे.

ब्रिजेंद्र सिंह यांनी ट्वीट करत म्हटले, “कुस्तीपटूंनी आयुष्यभर मेहनत करून पदक मिळवले आणि आता ते नदीत विसर्जित करत असल्यामुळे त्यामागील वेदना आणि असहायता मला जाणवते आहे. ही पदके ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, आशियाई खेळात विजय संपादन करून मिळवली आहेत. हृदयद्रावक असा हा प्रकार आहे.”

nashik bjp marathi news, bjp dindori lok sabha election 2024
कोणता समाज, घटक नाराज आहे ? दिंडोरी लोकसभेसाठी भाजप निरीक्षकांकडून चाचपणी
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
sushma andhare
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांंच्या समोर लढणे आम्हाला मोठे आव्हान वाटतच नाही; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे मत
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध

ब्रिजेंद्र सिंह हे हरयाणामधील भाजपाचे एकमेव खासदार आहेत, जे खेळांडूच्या बाजूने बोलण्यास उतरले आहेत. २८ एप्रिल रोजी त्यांनी आणखी एक ट्वीट केले होते. “आपले कुस्तीपटू रस्त्यावर आंदोलनासाठी बसले आहेत, हे निराशाजनक चित्र आहे. जर त्यांच्यावर काही अन्याय झाला असेल तर तो दूर करण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या खेळाडूंना सरावावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि भारताला पदके मिळवून देण्यास प्रवृत्त करणारे वातावरण उपलब्ध करून देण्याची मी सरकारला विनंती करतो.”, अशी मागणी त्यांनी ट्वीटद्वारे केली होती.

हे वाचा >> कुस्तीपटू गंगेत पदक विसर्जित करणार? बॉक्सर मोहम्मद अली यांनी वर्णद्वेषाचा निषेध करण्यासाठी सुवर्णपदक नदीत फेकले होते

खासदार बिजेंद्र सिंह यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी मध्यंतरी दिल्लीच्या जंतरमंतर येथे प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलक खेळाडूंशी संवाद साधला होता. कुस्तीपटू करीत असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. दरम्यान, कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत विसर्जित करू नयेत, असे आवाहन हरयाणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंह हुड्डा यांनी केले आहे. ही पदके देशाचा अभिमान आहेत आणि कोणत्याही सरकार किंवा व्यक्तीच्या उपकारामुळे ती मिळालेली नाहीत. ज्या देशाने तुमचा विजय साजरा केला, तो देश तुमच्यासह ठामपणे उभा आहे. निराश होऊ नका, असेही ते म्हणाले.

भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते गुरनाम सिंह चढूनी यांनीदेखील खेळाडूंना पदके विसर्जित न करण्याची विनंती केली. चढूनी यांनी ४ जूनपर्यंत खेळाडूंना थांबण्यास सांगितले आहे. जेणेकरून खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी सोनिपत जिल्ह्यात राज्य पातळीवर पंचायत भरविण्याची तयारी करता येईल. भारतीय राष्ट्रीय लोक दल (INLD) पक्षाचे ज्येष्ठ नेते अभय सिंह चौटाला म्हणाले की, कुस्तीपटूंना त्यांचे पदक गंगेत विसर्जित करण्यासाठी भाग पाडले जात आहे, हे दुर्दैवी आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेल्या एका खासदाराला वाचविण्यासाठी भाजपा आज कोणत्या थराला चालला आहे, हे संपूर्ण जग पाहत आहे. कुस्तीपटूंना हा दिवस पाहावा लागेल, याचा मी कधीही विचार केला नव्हता.

हे वाचा >> Wrestlers Protest : “कुस्तीगीरांनी असं कुठलंही पाऊल…” केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा सल्ला

विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक हे कुस्तीपटू हरयाणा राज्यातून येतात. त्यामुळे हरयाणातील विरोधी पक्षाने सुरुवातीपासून या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. ७ मे रोजी हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सरकार आणि कुस्तीपटू यांच्यात संवादाचा दुवा म्हणून भूमिका अदा करण्याची तयारी दर्शविली होती. हरयाणाचे अपक्ष आमदार आणि ऊर्जामंत्री रणजीत सिंह चौटाला यांनीदेखील खेळाडूंची बाजू उचलून धरली. ते म्हणाले, जर एखाद्या व्यक्तीवर इतके गंभीर आरोप होत असतील तर त्याने स्वतःची बाजू मांडण्यापेक्षा सर्वात आधी राजीनामा दिला पाहिजे. मला तर त्यांचा चेहराही आवडत नाही.

ऊर्जामंत्री रणजीत सिंह चौटाला हे माजी उपपंतप्रधान देवी लाल यांचे सुपुत्र आहेत. ते म्हणाले की, १९५६ साली एक रेल्वे अपघात झाल्यानंतर लाल बहादुर शास्त्री यांनी स्वतःचा राजीनामा दिला होता. १९९० साली मेहाम येथे झालेल्या गोळीबारात आठ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. माझ्यासोबत सहा इतर मंत्रीही मंत्रिमंडळातून बाहेर पडले होते.