हसन मुश्रीफ-समरजितसिंह घाटगे यांच्यातील संघर्ष पुढच्या टप्प्यावर

मुश्रीफ यांचे राजकीय विरोधक व  भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थकांनी तक्रारीचा ओघ सुरू ठेवला असल्याने उभयतांमधील संघर्ष पुढच्या टप्प्यावर जात आहे.

Hasan Mushrif Samarjitsinh Ghatge
हसन मुश्रीफ – समरजितसिंह घाटगे यांच्यातील संघर्ष पुढच्या टप्प्यावर

कोल्हापूर : चौकशी यंत्रणांना सामोरे जाण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ आणि समर्थकांनी चालवली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मुश्रीफ यांनी आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी शेकडो समर्थकांनी मुंबई गाठली आहे. तर रामनवमीला मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैतांना अभिषेक घालून भाजपच्या हिंदुत्वाला उत्तर दिले जात आहे.  दुसरीकडे मुश्रीफ यांचे राजकीय विरोधक व  भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थकांनी तक्रारीचा ओघ सुरू ठेवला असल्याने उभयतांमधील संघर्ष पुढच्या टप्प्यावर जात आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

 आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप भाजपकडून करण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतचे अनेक मुद्दे लावून धरले आहे. त्यावर प्राप्तिकर विभाग, अंमलबजावणी संचलनालय आणि पोलिसांचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून चौकशी सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात शिवजयंती व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त मुश्रीफ यांनी शक्तीप्रदर्शन केले होते. अजित पवार यांनीही  तपास यंत्रणांचा गैरवापर सत्ताधारांकडून केला जात आहे. अशा स्थितीत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीय हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी असल्याने एकटे पडू देणार नाही,’ असे भाष्य करून त्यांना धीर दिला होता.

हेही वाचा >>> राहुल गांधींच्या शिक्षेमागे भाजपच्या ओबीसी राजकारणाचे गणित

मुंबई पर्यंत संघर्ष

मुश्रीफ – घाटगे यांचातील स्थानिक संघर्ष पुढील टप्प्यावर जाताना दिसत आहे. ‘ सर सेनापती घोरपडे साखर कारखान्याची सभासद होण्यासाठी भाग भांडवलकरिता दहा हजार रुपये घेतले. पण सभासद केले नाही. कारखान्याची मालकी मात्र मुश्रीफ कुटुंबियांची दिसते. या व्यवहारात त्यांनी आर्थिक फसवणूक केली आहे,’ अशी तक्रार घाटगे समर्थकांनी कोल्हापुरातील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे केली आहे. यापूर्वी त्यांचे समर्थक विवेक कुलकर्णी यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात अशीच तक्रार मुरगूड पोलिसांत केली होती. घाटगे यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा बँकेसह संताजी घोरपडे कारखान्याविषयी एकापाठोपाठ तक्रारी सुरू आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी मुश्रीफ समर्थकांची आहे. मुश्रीफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेल्या विवेक कुलकर्णींसह १६ जणांच्या तक्रारीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीचा खुलासा करण्यासाठी शेकडो सभासद शेतकऱ्यांनी काल मुंबईतील ईडी कार्यालयावर धडक मारली. यापूर्वी कुलकर्णी यांच्या विरोधात खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी मुश्रीफ समर्थकांनी  गुन्हा दाखल केला आहे. अशाप्रकारे कागलमधील संघर्षाचे वारे आता राजधानी मुंबई पर्यंत धडकले आहे.

हेही वाचा >>> शिक्षेला स्थगिती देऊनही राष्ट्रवादीच्या खासदाराची अपात्रता कायम

पुन्हा शक्तिप्रदर्शन

रामनवमीला मुश्रीफ यांचा तिथीनुसार वाढदिवस साजरा केला जातो. कागल मतदारसंघात भाजप कडून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला जात आहे. यामुळे शिवजयंती निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून भगवे वादळ आणणारा उपक्रम कागल मध्ये जोरदारपणे राबवला होता. आता रामनवमी दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामदैवतांना अभिषेक, महाआरती करण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमाद्वारे हिंदुत्वाच्या मुद्द्याशी आपणही तितकेच निगडित असल्याचे दाखवून दिले जात आहे. मतदारसंघातून अनेक मंदिरांची उभारणी करणाऱ्या मुश्रीफ यांची मंदिरवाले बाबा अशी प्रतिमा पुढच्या टप्प्यावर घेण्याचा हा आणखी एक प्रयत्न समर्थकांनी चालवला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 10:44 IST
Next Story
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींविरोधातील ‘त्या’ खटल्याची चर्चा, मागितली होती बिनशर्त माफी
Exit mobile version