Himachal Pradesh Election 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेसाठी भाजपा आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ८ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जरी असला तरी एक्झिटपोलनुसार या दोन्ही पक्षात अटीतटीची लढत राहणार असल्याचे चित्र आहे. महत्तवाचे म्हणजे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज आहे. कारण, जवळपास ८ ते १० अपक्ष उमेदवार विजयी होतील असं एक्झिट पोलनुसार समोर आलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून अपक्षांना आपल्या बाजून वळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात होते आणि या निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ७५.६ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत मुख्यमंत्री जयराम ठाकुर, माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंहांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर, हिमाचल प्रदेशातील नागरिक भाजपाला पुन्हा संधी देतील, की विरोधी पक्ष काँग्रेससाठी सत्तेचा मार्ग मोकळा करतील, याची सर्वांना उत्सुकता आहे. ८ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल आहे. मात्र तत्पुर्वी विविध एक्झिट पोलनुसार निकाल समोर आले आहे.

Aaj Tak-Axis My India च्या एक्झिट पोलनुसार हिमाचलप्रदेशमध्ये भाजपाला २४ ते ३४ आणि काँग्रेसला ३० ते ४० जागा मिळत असल्याचे दिसत आहे. आम आदमी पार्टीचा सुपडासाफ होण्याची चिन्ह आहेत. याशिवाय ४ ते ८ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून येणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. बहुमतासाठी ३५ जागा जिंकाव्या लागणार आहेत. भाजपाला ४२ टक्क मतं, काँग्रेसला ४४ टक्के आणि आम आदमी पार्टीला केवळ दोन टक्के मत मिळताना दिसत आहेत.

विविध एक्झिट पोलच्या निकालानुसार जवळपास ८ ते १० अपक्ष उमेदवार निवडून येण्याची चिन्हं आहे. अशावेळी दोन्ही पक्षात अटीतटीची लढत असल्याने दोन्ही पक्षांसाठी अपक्षांचा पाठिंबा मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. अपक्ष उमेदवारच किंगमेकरची भूमिका निभावणार असल्याचे चित्र हिमचालमध्ये दिसत आहे.

मागील निवडणुकीत भाजपाने ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळवत बहुमताने सरकार बनवले होते. तर काँग्रेसला केवळ २१ जागा जिंकता आल्या होत्या. गुजरातप्रमाणेच हिमाचलमध्येही भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात त्रिशंकु लढत होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himachal pradesh election 2022 independent candidate will be kingmaker bjp and congress battle for power msr
First published on: 06-12-2022 at 22:16 IST