तुकाराम झाडे

हिंगोली : कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार डॉ.संतोष टारफे व वंचित बहुजन आघाडीचे नेते अजित मगर यांची पक्षीय सीमोल्लंघन करण्याची तयारी जवळपास निश्चित मानली जात आहे. केवळ नव्या घरोब्याचे ठिकाण कोणते, हे मात्र अद्यापि ठरलेले नाही. हे दोन्ही नेते राज्यातील सत्तांतरानंतरच्या न्यायालयीन प्रक्रियेतील निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर निर्माण झालेली संधी पाहून डॉ.टारफे व मगर या दोघांनीही विधानसभाच लढवायचे ठरवून जो पक्ष उमेदवारी देईल, तिथे प्रवेश करायचा असे ठरविल्याचे त्यांचे समर्थक सांगतात.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
There is a possibility of a code of conduct for the upcoming Lok Sabha elections
पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
himachal pradesh political crisis
हिमाचलमधील सरकार वाचविण्याचे प्रयत्न; काँग्रेस निरीक्षक राज्यात दाखल; नाराज आमदारांशी चर्चा

राज्यात सत्तांतर घडले आणि शिवसेनेत उभी फूट पडली. आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात उडी मारली. कळमनुरी मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे आमदार संतोष बांगर, वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे अजित मगर व काँग्रेसतर्फे डॉ. संतोष टारफे निवडणूक मैदानात होते. आमदार बांगर यांनी अजित मगर यांना जवळपास पंधरा हजार मतांच्या फरकाने हरविले. मगर दुसऱ्या क्रमांकावर तर डॉ. टारफे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. राज्यातील सत्तांतर व आमदार शिंदे गटात गेल्याने बांगर यांच्या विरोधात शिवसेनेकडून तुल्यबळ उमेदवार कोण, यावर आता सत्तांतराच्या निमित्ताने चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर…

कळमनुरी मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला. सत्तातरानंतरही या मतदारसंघातील शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते अद्यापि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार काय, याची चाचपणी डॉ. टारफे व मगर यांच्याकडून सुरू आहे.

डॉ. संतोष टारफे व अजित मगर हे दोघेही उच्चशिक्षित. डॉक्टर टारफे हे काँग्रेसचे माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांचे जावई. शालेय शिक्षण हिंगोलीत, तर वैद्यकीय शिक्षण औरंगाबादला पूर्ण केले. त्यांनी हिंगोलीतील जिल्हा रुग्णालयात दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. २००९ ला नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी बहुजन समाजवादी पक्षाकडून कळमनुरी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाला तरी, मतदान मिळवले २५ हजार ८०० एवढे. त्यांनी २००७ मध्ये आदिवासी युवक कल्याण संघटनेची स्थापना केली. आदिवासी समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी काम सुरू केले होते. कळमनुरी मतदारसंघात आदिवासी मतदारांची संख्या ही अधिक आहे. आजही ते या संघटनेचे राज्याध्यक्षपदी आहेत. आदिवासी समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. याच बळावर त्यांनी २०१४ मध्ये काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. त्यांना ६७ हजाराहूनअधिक मतदान झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार गजानन घुगे यांचा पराभव केला होता. गजानन घुगे आज घडीला भाजपमध्ये डेरेदाखल आहेत. शिंदे गट व भाजपची निवडणूक युती झाल्यास कळमनुरीची जागा शिंदे गटालाच सुटणार हे निश्चित मानले जात आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने संतोष बांगर यांना उमेदवारी दिली. काँग्रेसकडून डॉक्टर संतोष टारफे, तर वंचित बहुजन विकास आघाडीकडून अजित मगर हे निवडणूक मैदानात होते. निवडणुकीत मगर दुसऱ्यास्थानी राहिले.

अजित मगर हे कळमनुरी तालुक्यातील रहिवासी आहेत. ते दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या अत्यंत विश्वासातले असल्याने त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सातव यांचे काम अत्यंत हिरिरीने केले होते. त्यांनी बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना राज्य शासनाच्या वतीने वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार २०११ मध्ये मिळाला. तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांना पुरस्काराने गौरविले आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी हिंगोली जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने जि.प.च्या वाकोडी गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बहुमताने ती निवडणूक जिंकली. आता त्यांनाही विधानसभेची निवडणूक लढायची आहे, मात्र, मगर हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांच्या उमेदवारीला डॉ. प्रज्ञा सातव यांचा विरोध होईल, असे सांगण्यात येते.