Hingoli : Former MLA Santosh Tarfe going to join BJP soon | Loksatta

हिंगोली : माजी आमदार संतोष टारफे भाजपच्या उंबरठ्यावर

२०१२ पासून टारफे काँग्रेसमध्ये काम करत होते. २०१४ मध्ये ते कळमनुरीचे आमदार हाेते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचेही ते जवळचे नातेवाईक आहेत.

हिंगोली : माजी आमदार संतोष टारफे भाजपच्या उंबरठ्यावर
हिंगोली : माजी आमदार संतोष टारफे भाजपच्या उंबरठ्यावर

तुकाराम झाडे

हिंगोली : जिल्ह्यात काँग्रेस अंतर्गत गटबाजी असल्याने पक्षात काम करणे कठीण झाले आहे. आमदार प्रज्ञा सातव याच सर्वेसर्वा असल्यासारख्या वागत असून पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविण्याचे काम अवघड होऊन बसले आहे. पक्षात कुचंबणा होत असून तोडगा न निघाल्यास पर्यायी मार्गाचा विचार करावा लागेल, असे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेतील फाटाफुटीनंतर काँग्रेसमधील नाराज आमदारही सत्तेच्या वाटेवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. भाजप वा शिवसेनेतील पोकळीत टारफे स्वत:चे भविष्य तपासत असल्याची चर्चा अलिकडेच सुरू झाली होती. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह अन्य काही नेत्यांनी टारफे यांची भेट घेऊन पक्षांतराविषयी चर्चा केली होती. पक्षांतराच्या चर्चेबाबत विचारणा करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता,‘ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, असे असताना जिल्ह्यात पक्षांतर्गत गटबाजी कायम आहे. डॉ. प्रज्ञा सातव ह्याच सर्व निर्णय घेतात. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. गटबाजीमुळे पक्षात काम करणे माझ्यासारख्याला असह्य झाले आहे.’ असे सांगत.

हेही वाचा.. Uddhav Thckeray vs Eknath Shinde in SC Live: शिंदे सरकार वैध की अवैध? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

पक्षातील नाराजी लक्षात घेऊन भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला असल्याचे मान्य करत टारफे म्हणाले,की शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेसह अनेकांनी संपर्क केला आहे. सध्या तरी काँग्रेस पक्षातच आहे. परंतु काँग्रेसअंतर्गत गटबाजीवर पक्षश्रेष्ठीने वरिष्ठ पातळीवरून तोडगा न काढल्यास भविष्यात माझ्यासाठी इतर कोणत्याही पक्षाचा मार्ग मोकळा असेल. मराठवाड्यात काँग्रेसच्या नाराजांना भाजपकडून संपर्क साधला जात आहे. २०१२ पासून टारफे काँग्रेसमध्ये काम करत होते. २०१४ मध्ये ते कळमनुरीचे आमदार हाेते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचेही ते जवळचे नातेवाईक आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-08-2022 at 10:50 IST
Next Story
अनिल गोटेंच्या मल्हार बागेकडे पाठ करुन शरद पवारांचे युवा नेतृत्वाला बळ