संजीव कुळकर्णी

नांदेड : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व अन्य पदाधिकारी बुधवारी येथे आले होते. बैठक आणि नंतरची चर्चा आटोपल्यावर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे आणि इतरांना ‘राइस प्लेट’चे भोजन देऊन त्यांची येथून पाठवणी केली. विरोधी पक्षात आल्यामुळे काँग्रेस पक्षातील चंगळ थांबल्याचे या निमित्ताने दिसून आले.

Congress, Nana Patole car accident,
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल
Congress strongly criticized Prime Minister Narendra Modi for destroying the country reputation and democracy
मोदींकडून लोकशाहीच्या चिंध्या! काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
Former Congress MLA Namdev Usendi resigned alleging that money was the criterion for ticket distribution in Congress
काँग्रेसमध्ये तिकीट वाटपासाठी पैशांचा निकष, गंभीर आरोप करून काँग्रेसचे माजी आमदार उसेंडी यांचा राजीनामा
Buldhana constituency, seat demand, local Congress Bearers, resign, met nana patole, nagpur, maha vikas aghadi, lok sabha 2024, maharashtra politics, marathi news,
काँग्रेसच्या ‘राजीनामावीरां’नी गाठले नागपूर! प्रांताध्यक्षसोबत चर्चा ; पटोले म्हणाले, गडबड करू नका…

खा. गांधी यांची यात्रा दिवाळीनंतर नांदेड जिल्ह्यात दाखल होणार असली, तरी काँग्रेसने पूर्वतयारीची पहिली बैठक तब्बल दोन महिने आधी घेत कार्यकर्त्यांना त्याबाबत मार्गदर्शन केले. या निमित्ताने बुधवारी दुपारनंतर विश्रामगृह परिसर काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजलेला होता. त्याचवेळी हा पक्ष आता सत्तेत नसल्यामुळे एकंदर व्यवस्थेतील साधेपणाही ठळकपणे दिसला.

हेही वाचा… इचलकरंजीत विसर्जन मिरवणुकीत महापालिका निवडणुकीची बांधणी

माणिकराव ठाकरे यांनी दौऱ्यातील पहिली बैठक दुपारी हिंगोलीमध्ये घेतली. नंतर भोजन आटोपून ते नांदेडमध्ये आले. त्यांच्या आगमनापूर्वी ‘मिनी सह्याद्री’ विश्रामगृहातले सभागृह कार्यकर्त्यांनी गच्च भरले होते. दुपारी चार ही चहाची वेळ असल्यामुळे संयोजकांनी उपस्थितांना साध्या कागदी कपामध्ये चहा दिला.

खाली चहा-पाणी सुरू असताना वरच्या मजल्यावरील व्हीआयपी कक्षात पक्षनेते अशोक चव्हाण व इतर काहींचे भोजन सुरू होते. ठाकरे यांना पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे त्यांच्या आगमनाआधी चव्हाण यांनी बैठक सुरू करून दिली. जिल्हाध्यक्षांचे प्रास्ताविक सुरू असताना ठाकरे यांचे आगमन झाले. नंतर त्यांनी यात्रेच्या महाराष्ट्रातील कार्यक्रमाची माहिती दिली. ही यात्रा राज्यात सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यात दाखल होणार असून यात्रेदरम्यानचे सर्व कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडावेत, असे आवाहन ठाकरे यांनी उपस्थितांना केले. या बैठकीचा समारोप अशोक चव्हाण यांनी केला.

हेही वाचा… Ganapati Visarjan 2022 Live : आज निरोपाचा दिवस, महाराष्ट्रात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह!

काँग्रेस पक्ष दोन-अडीच महिन्यांपूर्वी सत्तेमध्ये होता. आता तो विरोधी बाकावर आल्यानंतर पक्षातील मरगळ, नेत्यांचा निरुत्साह, लोकप्रतिनिधींमधील अस्वस्थता आदी बाबी ठळकपणे दिसत होत्या. पक्ष सत्तेत कायम असता तर ठाकरेंच्या आगमनाच्या जाहिराती झळकल्या असत्या. विश्रामगृहात ठेवण्यात आलेली बैठक शहरातील उंची हॉटेलच्या सभागृहात झाल्याचे पाहायला मिळाले असते; मात्र कालच्या बैठकप्रसंगी जिल्हा काँग्रेसची काटकसरच पाहायला मिळाली.

काही महिन्यांपूर्वी याच पक्षाने एका ‘लॉन्स’वर मोठा मेळावा घेतला. त्याला जोडून केटरिंग सेवेचे महागडे भोजन पक्ष कार्यकर्त्यांनी चाखले. यापूर्वीही उत्तम भोजन व्यवस्था झकास राहील, हे पाहणाऱ्या जिल्हा काँग्रेसने बुधवारी आपल्या माजी प्रदेशाध्यक्षांना विश्रामगृहापासून जवळच असलेल्या एका साध्या हॉटेलमध्येच जेवायला नेले. त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी भोजनामध्ये सहभागी झाले. माजी मंत्री अशोक चव्हाण हे बैठकीनंतर औरंगाबादकडे तर कुशल संघटक आ. अमर राजूरकर स्वतंत्रपणे मुंबईला गेले. भोजनाचे निमंत्रण नसलेल्या बाहेरगावच्या अनेक कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्या गोदावरी बेकरीतील चाट फराळ करून परतीचा प्रवास सुरू केला.

हेही वाचा… मुख्यमंत्री शिंदे यांच्या गणेश दर्शन मोहिमेमुळे सर्वपक्षीय नेत्यांचे गणेश मंडळांचे भक्ती पर्यटन

खतगावकरांची वेगळी भावना

काँग्रेसच्या या बैठकीला भाजप सोडून पुन्हा पक्षात आलेले ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा यांची अनुपस्थिती दिसली. खतगावकर यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगण्यात आले. पण बैठक सुरू होण्यापूर्वीच आ. अमरनाथ राजूरकर हे खतगावकर यांच्या भेटीसाठी गेले होते, अशी माहिती नंतर समोर आली. या भेटीमागचे प्रयोजन अधिकृतपणे कळले नाही; पण काँग्रेस पक्षाचे भवितव्य फार काही चांगले नाही, याचा विचार करून अशोक चव्हाण यांनी योग्य तो राजकीय निर्णय घेतला पाहिजे, अशी खतगावकरांची भावना असल्याचे समजते.