scorecardresearch

“एकवेळ मरण पत्करू, पण भाजपासोबत जाणार नाही…”, नितीश कुमारांचा भाजपावर हल्लाबोल

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीसोबत युतीबाबतच्या सर्व शक्यता सोमवारी फेटाळून लावल्या.

Nitish Kumar BJP alliance
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीसोबत युतीबाबतच्या सर्व शक्यता सोमवारी फेटाळून लावल्या.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीसोबत युतीबाबतच्या सर्व शक्यता सोमवारी फेटाळून लावल्या. नितीश कुमार म्हणाले की, “आम्ही भाजपासोबत हात मिळवण्याऐवजी मरण पत्करू. २०१७ मध्ये आम्ही एनडीएत गेलो ही आमची मोठी चूक होती.” कुमार यांचा जनता दल (युनायटेड) आणि भाजपाने २०१७ मध्ये युती केली होती. ही युती पुढे टिकली नाही. यापुढे देखील उभय पक्षांमध्ये युती होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं कुमार यांनी आज स्पष्ट केलं.

जनता दलाच्या (युनायटेड) नेत्यांनी भाजपाला आठवण करून दिली की, “दोन पक्षांची युती होती तेव्हा भाजपाला मुस्लीम मतदारांसह जनता दलाचे सर्व समर्थक मतदान करायचे. भाजपाच्या हिंदुत्वाच्या विचारधारेमुळे जे लोक भाजपासोबत नव्हते त्यांची मतं जनता दलामुळे भाजपाला मिळत होती.”

भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे की, पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष बिहारमध्ये ४० पैकी ३६ जागा जिंकेल. नितीश कुमार यांनी भाजपाच्या या दाव्याची खिल्ली उडवली.

२०१७ मध्ये एनडीएशी केलेली हातमिळवणी ही मोठी चूक होती

कुमार म्हणाले की, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या ‘निराधार’ आरोपांनंतर २०१७ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत हातमिळवणी करणं ही आमची चूक होती.

हे ही वाचा >> भारत जोडो समारोप यात्रेत प्रियांका गांधी यांचे जोरदार भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”

जदयू आणि राजदची युती

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जनदा दल युनायटेडने (जदयू) भारतीय जनता पक्षासोबत युती तोडून राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:08 IST