मोहनीराज लहाडे

नगरः भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नगरच्या दौऱ्यात, पक्षाच्या बैठकीत नगर शहर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार आयात करणार नाही, अशी ग्वाही देत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या अस्वस्थतेनंतरच त्यांना ही ग्वाही देणे भाग पडले आहे. भाजपची सध्याची वाटचाल पाहता त्यांनी दिलेली ग्वाही कितपत खरी ठरते असाही प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.

Tamil Nadu news M. K. Stalin
तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?

परंतु तरीही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्यानंतरच त्यांना ही ग्वाही द्यावी लागली. अशाच भावना कार्यकर्त्यांनी यापूर्वी प्रदेशाध्यक्ष आणि त्यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्षांकडेही व्यक्त केलेल्या आहेत. सन २०१४ व त्यानंतर इतर पक्षांकडून भाजपमध्ये देश आणि राज्य पातळीवर सुरू झालेल्या लोंढ्यातून निष्ठावान भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचेच हे प्रतिबिंब नगरमध्ये उमटले आहे.

हेही वाचा… विजय शिवसेनेचा अन वादाची घुसळण कोल्हापूर काँग्रेसच्या दोन गटात

त्याला कारणही तसेच घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व त्यांचे चिरंजीव वैभव पिचड, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, काँग्रेसमधून ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे, त्यांचे चिरंजीव सुजय विखे, जिल्ह्यातील अशा अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपले बस्तान बसवले. काँग्रेसमधून बाहेर ढकलले गेलेले, नाशिक पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी स्वतःला अपक्ष म्हणून जाहीर केले असलेतरी भाजपच्या पाठिंब्यावर ते विजयी झाल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे मानले जाते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भाचे आमदार तांबे यांच्या भूमिकेबद्दल मौन ठेवत भाजपला अनुकूलता प्राप्त करून दिली.

हेही वाचा… उद्धव ठाकरे-अरविंद केजरीवाल बैठकीचा अर्थ काय? मुंबई पालिका निवडणुकीसाठी युती होणार?

भाजप खासदार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये निर्माण झालेली राजकीय सलगी भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ्य करते आहे. नगर शहरात अनेकदा विकास कामांच्या कार्यक्रमासाठी खासदार विखे यांच्यासमवेत भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी अनुपस्थितीत असतात मात्र राष्ट्रवादीचे आमदार जगताप हमखास उपस्थित असतात. रा. स्व. संघ व परिवारातील संघटनाच्या दडपणातून काही दिवसांपूर्वी खासदार विखे यांनी ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर या सारख्या वादग्रस्त विषयाची पाठराखण करणे भाग पडले. अन्यथा इतके दिवस खा. विखे यांनी या वादग्रस्त विषयापासून स्वतःला दूर ठेवले होते.

हेही वाचा… Kasba Bypoll Election Result 2023: “लोकांनी पैसे घेतले पण मत ह्रदयातल्या धंगेकरांना दिलं”, रवींद्र धंगेकरांचं मोठं विधान; गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण!

आता भाजप खासदार विखे यांच्याशी राजकीय मैत्रं जपणारे राष्ट्रवादीचे आमदार जगताप हे अलीकडच्या काळात रा. स्व. संघ परिवारातील हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक हजेरी लावताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी विश्व हिंदू परिषदेला देणगी दिली. या संघटनांनी आयोजित केलेल्या हिंदू धर्मसभा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्र्यावरील कार्यक्रमांना असलेली त्यांची उपस्थिती यामुळे आमदार जगताप यांच्या पूढील राजकीय वाटचालीची चर्चा होऊ लागली आहे. भाजपच्या विशेषतः नगर शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ होण्यामागील हेचतर प्रमुख कारण आहे. स्वतः आ. जगताप याबद्दल कोणतीही वाच्यता करत नाहीत. मात्र संघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमांना त्यांची असणारी उपस्थिती त्यांच्या वाटचालीची दिशा दाखवतात.

हेही वाचा… लाचलुचपत प्रतिबंधक विभाग शिवसेना आमदार साळवी यांच्या हाॅटेल-घरापर्यंत

मात्र जिल्ह्यातील इतर पक्षातील नेत्यांच्या प्रवेशावेळी प्रदेश व देश पातळीवरील नेत्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फारसे विचारात घेतले नव्हते. किंबहूना विरोध डावलूनच विखे, पिचड यांना प्रवेश दिला गेला होता. आतातर भाजपश्रेष्ठीकडून मंत्री राधाकृष्ण विखे यांना विशेष पाठबळ दिले जात आहे. अर्थात जिल्ह्यातील ज्या नेत्यांना भाजपने पक्षप्रवेश दिला, त्या बहुसंख्य मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे सक्षम उमेदवारही नव्हता की तेथे यापूर्वी कधी पक्षाला निवडणुकीत संधी मिळालेली नाही. त्यामुळे या नेत्यांच्या पक्षप्रवेशाने भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये फारशी अस्वस्थता निर्माण झालेली नव्हती.

हेही वाचा… Kasba Chinchwad Bypoll Election Result Live: कसब्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांची विजयाच्या दिशेने आगेकूच, भाजपाच्या बालेकिल्ल्यात मविआची मुसंडी!

परंतु नगर शहरात मात्र याची चाहूल लागताच त्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्याने प्रदेश महामंत्र्यांना ग्वाही देण्याची वेळ आली. अर्थात जिल्ह्यातील इतर ठिकाणाप्रमाणेच नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील भाजपला कधी संधी मिळालेली नाही आणि महापालिकेतही कधी भाजप स्वबळावर सत्ता प्राप्त करु शकलेला नाही. भाजपला अनुकूलता लाभूनही युतीच्या दीर्घ वाटचालीत नगर शहरावर तत्कालीन शिवसेनेचेच वर्चस्व राहीले. त्यातून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वाटेला मोठीच कुचंबणा आली. आता पक्षाच्या माध्यमातून विधानसभेसाठी उमेदवारीची संधी मिळेल, याच्या प्रतिक्षेत शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी शहराध्यक्ष वसंत लोढा असे अनेकजण आहेत. इच्छुकांच्या भाऊगर्दीतून ही अस्वस्थता पुढे आणली गेली आहे.

अडीच वर्षांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत भाजपने नगरचे महापौर पद पटकावले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही नगरचे महापौर पद शिवसेनेकडे जायला नको या स्थानिक राजकारणातून आमदार जगताप यांनी पाठिंबा देत अल्पसंख्याबळ असणाऱ्या भाजपला महापौर पद बहाल केले. त्यावेळी कोणत्याही भाजप पदाधिकाऱ्याकडून अशी अस्वस्थता व्यक्त झाली नव्हती. त्यावेळी शहरात माजी खासदार दिलीप गांधी यांचे नेतृत्व होते आणि भाजपमधील बहुसंख्यांना त्यांनी घेतलेला निर्णय मान्य होता. आता शहर भाजपमध्ये एकमुखी नेतृत्वाचा आभाव निर्माण झाला आहे. इच्छुक नेत्यांची संख्याही अधिक झाली आहे. त्यातून ग्वाही देण्याचा प्रसंग निर्माण झाला.